31 C
Mumbai
Friday, November 20, 2026
घरराजकारण'तो' मोहम्मद सिराज आहे म्हणून त्याला वगळले?

‘तो’ मोहम्मद सिराज आहे म्हणून त्याला वगळले?

काँग्रेस नेते इम्रान मसूद यांनी संघनिवडीत घुसवला धर्म

Google News Follow

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी न दिल्याबद्दल आता राजकीय वाद उत्पन्न करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला अंतिम अकरा खेळाडूंच्या संघातून वगळण्यात आल्यानंतर काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी यामागे खेळाडूचा धर्म हे कारण असल्याचा आरोप केला आहे. सिराजला संघातून वगळण्याच्या निर्णयावर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत, पण ते क्रिकेटच्या दृष्टिकोनातून आहे.

भाजपने मसूद यांच्या वक्तव्यावर टीका केली असून, भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळपट्टीची परिस्थिती आणि सामन्याची गरज लक्षात घेऊनच संघनिवड केल्याचे स्पष्ट केले आहे.

गुरुवारी (१९ नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने मोहम्मद सिराजला अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात स्थान दिले नाही. कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी जसप्रीत बुमराह, आकाश दीप, अंशुल कंबोज आणि प्रसिद्ध कृष्णा या चार वेगवान गोलंदाजांची निवड केली. मात्र, सिराजला संधी देण्यात आली नाही.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणाले, “त्याचे नाव सिराज आहे, हेच कारण पुरेसे नाही का?” सिराजच्या कामगिरीनंतरही त्याला संघात स्थान का मिळाले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शुक्रवारी एएनआयशी बोलताना सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांना मोहम्मद सिराजच्या संघातील निवडीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सिराजची कामगिरी संघातील स्थानासाठी पुरेशी असतानाही त्याला संधी नाकारण्यात आल्याचे सांगितले. मसूद म्हणाले, “त्याचे नाव सिराज आहे, हेच कारण पुरेसे नाही का? तो चांगली कामगिरी करत असेल आणि तरीही त्याची निवड होत नसेल, तर यामागे दुसरे कोणते कारण असू शकते? हे एकच कारण असू शकते. याशिवाय दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही.”

हे ही वाचा:

शेअर बाजारात तुफानी तेजी! सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला

हुतींच्या हल्ल्यांनी तेल बाजारात खळबळ

जीटीए ६ ची पहिल्याच दिवशी २२ हजार कोटींची विक्रमी कमाई

सोने-चांदीनंतर आता तांब्याचे दरही कोसळले

पत्रकाराने सिराज मुस्लिम असल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे, असे तुम्हाला सुचवायचे आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावरही मसूद यांनी आपली भूमिका कायम ठेवत हेच एकमेव कारण असू शकते, असे म्हटले.

भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी मसूद यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्याला जातीय आणि धार्मिक रंग देणारे तसेच बेजबाबदार वक्तव्य असल्याचे म्हटले. क्रिकेटमध्ये संघनिवड ही संघाच्या गरजा आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ वकील नलिन कोहली यांनी इंडिया टुडेशी बोलताना मसूद यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “इम्रान मसूद यांच्या मूर्खपणाच्या वक्तव्याची कोणाला पर्वा आहे? ते स्पष्टपणे जातीयवादी व्यक्ती आहेत.”

पुढे ते म्हणाले, “एखाद्या व्यक्तीचा धर्म कोणता आहे, यावर क्रिकेट खेळले जात नाही. क्रिकेटमध्ये संघाच्या प्राधान्यक्रमानुसार निर्णय घेतले जातात. त्यासाठी निवड समिती असते.”

सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी सिराजला वगळण्याच्या निर्णयावर उपस्थित केलेले प्रश्न आणि मसूद यांनी केलेले राजकीय आरोप यांमध्ये फरक असल्याचेही कोहली यांनी स्पष्ट केले. माजी क्रिकेटपटूंना त्यांच्या मतानुसार निवड प्रक्रियेवर भाष्य करण्याचा अधिकार असल्याचे सांगतानाच त्यांनी मसूद यांच्या वक्तव्याला राजकीय आणि जातीयवादी स्वरूपाचे म्हटले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा