31 C
Mumbai
Friday, November 20, 2026
घरदेश दुनियाबांग्लादेशात हिंसाचाराच्या उद्रेकात चौघांचा मृत्यू

बांग्लादेशात हिंसाचाराच्या उद्रेकात चौघांचा मृत्यू

पोलीस ठाणे आणि बँकेवर हल्ले

Google News Follow

बांग्लादेशमध्ये राजकीय अस्थिरतेने पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले असून, देशभरात हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राजधानी ढाक्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ, बॉम्बहल्ले, तोडफोड आणि राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांवर हल्ले करण्यात आले आहेत. मंत्र्यांची घरे, पोलीस ठाणी आणि बँकांनाही लक्ष्य करण्यात येत असल्याने देशातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांतील हिंसक घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

या हिंसाचाराचे पडसाद राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांवरही उमटले आहेत. उपपरराष्ट्रमंत्री हुमायून कबीर यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी जाळपोळ केली. यामध्ये घराच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी ग्रीलचे नुकसान झाले. याशिवाय अवामी लीगशी संबंधित नेत्यांच्या घरांवरही हल्ले करण्यात आले. १८ नोव्हेंबर रोजी स्वेच्छासेवक लीगचे अध्यक्ष गाजी मेस्बाउल हुसेन साच्चू यांच्या घरात घुसून तोडफोड करण्यात आली, तर त्यांच्या वाहनांनाही आग लावण्यात आली. जुबो लीगचे महासचिव मैनुल हुसेन खान निखिल यांच्या निवासस्थानालाही लक्ष्य करण्यात आले.

हे ही वाचा:
अँथ्रोपिकच्या आयपीओने कर्मचाऱ्यांचे नशीब पालटले

सोने-चांदीनंतर आता तांब्याचे दरही कोसळले

रॉयल एनफिल्डची आता स्वस्त बाईक येणार

शेअर बाजारात तुफानी तेजी! सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला

दरम्यान, हिंसाचाराचे लक्ष्य आता पोलीस यंत्रणा आणि आर्थिक संस्थाही बनल्या आहेत. देशातील तीन पोलीस ठाण्यांमध्ये तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली असून, दोन पोलीस ठाण्यांवर क्रूड बॉम्बने हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण बँकेच्या शाखांनाही हल्लेखोरांनी लक्ष्य केले आहे. १० नोव्हेंबरपासून बँकेच्या सुमारे ७२ शाखांवर आग लावण्याचे प्रयत्न किंवा हल्ले झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बँकिंग सेवा आणि ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

१४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान बांग्लादेशातील किमान १२ जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या चर्चेमुळे राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे मानले जात आहे. अवामी लीगशी संबंधित कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आणि सुरक्षा यंत्रणांसमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. वाढत्या हिंसाचारामुळे बांग्लादेशच्या राजकीय स्थैर्यासह देशाच्या आर्थिक व्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा