30 C
Mumbai
Friday, November 20, 2026
घरबिजनेसरॉयल एनफिल्डची आता स्वस्त बाईक येणार

रॉयल एनफिल्डची आता स्वस्त बाईक येणार

२५० सीसी सेगमेंटमध्ये उतरण्याची तयारी

Google News Follow

रॉयल एनफिल्ड म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती बुलेटची दमदार बॉडी, रुबाबदार लूक आणि खास आवाज. मात्र, रॉयल एनफिल्डची बाईक खरेदी करण्याची इच्छा असूनही किंमत आणि इंजिन क्षमतेमुळे अनेक ग्राहकांना बजेटचा विचार करावा लागतो. आता अशाच ग्राहकांसाठी कंपनी एक मोठी तयारी करत आहे. रॉयल एनफिल्ड लवकरच २५० सीसी मोटारसायकल सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ही बाईक सध्याच्या ३५० सीसी मॉडेल्सपेक्षा अधिक परवडणारी असू शकते. त्यामुळे कमी बजेटमध्ये रॉयल एनफिल्डची बाईक खरेदी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

सध्या भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफिल्डच्या ३५० सीसी ते ६५० सीसी क्षमतेच्या बाईक उपलब्ध आहेत. मात्र, कंपनी आता १०० ते १२५ सीसीच्या सामान्य बाईक वापरणाऱ्या ग्राहकांना प्रीमियम सेगमेंटकडे आकर्षित करण्याच्या तयारीत आहे. यासाठी स्वतंत्र २५० सीसी प्लॅटफॉर्म विकसित केला जाण्याची शक्यता आहे. या नव्या प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा अधिक मॉडेल्स सादर होऊ शकतात. कंपनीच्या या निर्णयामागे वाढती मागणी हे प्रमुख कारण आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत २०० ते २५० सीसी बाईकच्या विक्रीत तब्बल ७५ टक्क्यांची वाढ झाली असून, १ लाख ९१ हजार १२६ बाईकची विक्री झाली आहे.

हे ही वाचा:
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज!

महाराष्ट्राच्या धरणांमधील पाणीसाठा ६४ टक्क्यांवर!

काश्मीरमधील शेवटचा ज्ञात स्थानिक लश्कर दहशतवादी ठार

अमेरिकेतून हद्दपार होताच खलिस्तान समर्थकाला अटक

या नव्या बाईकच्या लॉन्चबाबत बोलायचे झाल्यास, पुढील आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात म्हणजेच २०२७-२८ या आर्थिक वर्षात ती बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाव्य किंमत, इंजिनची क्षमता आणि मायलेज याबाबत अद्याप कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. काही वृत्तांमध्ये या बाईकची किंमत १.२५ लाख ते १.५० लाख रुपयांच्या दरम्यान असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच हायब्रिड तंत्रज्ञान आणि अधिक मायलेज मिळण्याचीही चर्चा आहे. मात्र, या सर्व बाबींना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

रॉयल एनफिल्डच्या या निर्णयामुळे भारतीय दुचाकी बाजारपेठेतील स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. सध्या कंपनीचा देशांतर्गत मोटारसायकल बाजारातील हिस्सा ८.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मध्यम ते दीर्घकालीन काळात हा हिस्सा तिप्पट करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे २५० सीसी सेगमेंटमधील प्रवेश कंपनीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, कमी किमतीत बाईक आणताना रॉयल एनफिल्डचा खास रुबाब, दमदार राइडिंग अनुभव आणि ब्रँडची ओळख कायम ठेवण्याचे मोठे आव्हान कंपनीसमोर असेल.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा