मालवणीत पकडला ‘मुन्नाभाई एमबीबीएस; चालवत होता क्लिनिक

पत्नीवरही गुन्हा दाखल

मालवणीत पकडला ‘मुन्नाभाई एमबीबीएस; चालवत होता क्लिनिक

मालाड मालवणी परिसरात खाजगी रुग्णालय थाटून रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरसह त्याच्या पत्नीवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारावी पर्यत शिक्षण झालेक्या या बोगस डॉक्टरवर मुलुंड पोलीस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न तसेच ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

परवेज अब्दुल अजीज शेख असे या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.परवेज ची पत्नी ‘बीयुएमएस’ची पदवी असून तिला औषधे, इंजेक्शन ठेवण्याची परवानगी नाही.

परवेज आणि त्याची पत्नी हे दोघे मालवणी परिसरात ‘अजीज पॉली क्लिनिक’ नावाने रुग्णालय उघडून बसला होता.परवेज याने अनेक रुग्णांना आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले होते. तसेच गरीब रुग्णावर उपचार करून त्यांना औषधे देऊन रुग्णााच्या जीवाशी खेळत होता.

या बोगस डॉक्टरची माहिती गुन्हे शाखा कक्ष १२ यांना मिळाली असता गुन्हे शाखेने मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांच्यासह अजीज पॉली क्लिनिक वर छापा टाकून या मुन्नाभाईचे पितळ उघडे पाडले.

हे ही वाचा:

गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू

न्यायपालिकेवर टीका करणाऱ्यांविरोधात ६०० वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

पवारांचे फासे उताणे पडतायत…

भारताशी शत्रुत्वानंतर एकेका थेंबासाठी मालदीव तहानलेले

गुन्हे शाखेने आणि वैद्यकीय अधिकारी यांनी त्याच्याकडे वैद्यकीय पदवी आणि प्रमाणपत्रा बाबत चौकशी केली असता त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची पदवी नसल्याचे आढळून आले. तसेच बोगस डॉक्टर परवेज याच्यावर मालवणी पोलीस ठाण्यात २ गुन्हे,कापूरबावडी पोलीस ठाण्यात १ आणि मुलुंड पोलिस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न या सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची पोलिसांच्या चौकशीत समोर आली.

Exit mobile version