31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरदेश दुनियाभारताशी शत्रुत्वानंतर एकेका थेंबासाठी मालदीव तहानलेले

भारताशी शत्रुत्वानंतर एकेका थेंबासाठी मालदीव तहानलेले

चीनपुढे हात टेकल्यानंतर मिळाला दिलासा

Google News Follow

Related

भारताशी वितुष्ट पत्करल्यानंतर मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या पावलांमुळे तेथील लोकांच्या हालात दिवसेंदिवस भर पडत आहे. सन २०१४नंतर पुन्हा मालदीववर जलसंकट ओढवले आहे. मालदीवचे नागरिक थेंब थेंब पाण्यासाठी तहानलेले आहेत. सन २०१४मध्ये भारताने संकटमोचक होऊन मालदीवमध्ये ऑपरेशन नीर चालवून पाणी उपलब्ध करून दिले होते. यावेळी या जलसंकटातून वाचण्यासाठी मालदीवने भारत नव्हे तर चीनकडून मदत मागितली आहे.

चीनपुढे शरणागती पत्करल्यानंतर जिनपिंग यांनी दिलासा दिला. चीन सरकारने मालदीवला १५०० टन पिण्याचे पाणी दान केले आहे. हे पाणी चीनला तिबेटातील हिमनद्यांतून जमा झालेले मिळालेले आहे.हे पाणी सुरळीत मालदीवपर्यंत पोहोचल्याचे मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत सांगण्यात आले. तिबेटातील चिनी प्रतिनिधी आणि अध्यक्ष यान जिनहाई यांच्या माले यात्रेदरम्यान झालेल्या यशस्वी चर्चेचा हा परिणाम असल्याचे मालदीव सरकारने म्हटले आहे. त्यावेळी मालदीवने देशावरील जलसंकटाची माहिती देऊन मदतीचे आवाहन केले होते.

हे ही वाचा:

‘नागरी सेवा परीक्षेसाठी पाच ते आठ वर्षांची तयारी म्हणजे तरुणांच्या ऊर्जेचा अपव्यय’

नीरव मोदीचे लंडनमधील घर विकण्यास न्यायालयाची परवानगी

नोटांवर झोपलेल्या आसामच्या राजकीय नेत्याच्या छायाचित्रावरून वाद

‘निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत’

आतापर्यंत तीनवेळा मागितली चीनकडे मदत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल भारतीयांनी जेव्हा मालदीववर बहिष्कार टाकला होता, तेव्हा पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या मालदीवला चीनकडे मदत मागावी लागली होती. चीनने त्यांच्या देशातील नागरिकांना मालदीवला पर्यटनासाठी जाण्याचे आवाहन करावे, अशी मागणी मालदीवने चीनच्या सरकारकडे केली होती. त्यांनी तर, मार्च महिन्यात मालदीवने चीनसोबत लष्करी करार केला होता. या अंतर्गत चीनच्या लष्कराने मालदीवला लष्करी साहित्याचे प्रशिक्षण दिले होते.

भारताने चालवले होते ऑपरेशन नीर

मालदीवचा बहुतांश भाग टेकड्या आणि रेतीच्या डोंगरांनी बनला आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढलेल्या मालदीवला हवामान बदलामुळे सातत्याने भूजल आणि गोड्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो. डिसेंबर, २०१४मध्ये माले जल आणि सीव्हरेज कंपनी परिसरात भीषण आग लागल्याने मालदीवमध्ये गंभीर पाणीसंकट आले होते. तेव्हा भारताने मालदीवमध्ये ‘ऑपरेशन नीर’ चालवले होते. भारतीय विमानांनी ३७५ टन पिण्याचे पाणी पोहोचवले होते. दोन भारतीय जहाजे, आयएनएस दीपक आणि आयएनएस सुकन्याने सुमारे दोन हजार टन पाणी पोहोचवले होते. त्यामुळे मालदीवच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा