36 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारण‘निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत’

‘निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत’

निर्मला सीतारमण यांचे स्पष्टीकरण

Google News Follow

Related

लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विचारणा केली असता, ‘मी लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारले कारण माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूक रोखे वटवले आहेत. त्यामुळे कोणालाच काहीही म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही त्या म्हणाल्या.

निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्रस्ताव मी नाकारला, असे सीतारामण म्हणाल्या. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना आंध्र प्रदेश अथवा तमिळनाडूतून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता. मात्र एक आठवडा किंवा १० दिवस विचार केल्यानंतर मी त्यांना नकार दिला. माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी तशा प्रकारचा पैसा नाही, असे त्या म्हणाल्या.

निवडणूक निधीसाठी चांगल्या यंत्रणेची आवश्यकता

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांची योजना रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी निधी जमा करण्यासाठी चांगली यंत्रणा आणण्याची तसेच त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, हे निवडणूक रोखे तेव्हा प्रचलित कायद्यानुसार खरेदी केले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

२८ वर्षे जुन्या खटल्यात आयपीएस अधिकारी संजीव भट्ट दोषी

संदेशखालीतील महिला म्हणजे ‘शक्तीस्वरूप’

“खिचडी चोराचं काम करणार नाही”

चेन्नईकडून गुजरातचा पराभव

ज्यांनी आरोप केले, त्यांनीच रोखे वटवले

निवडणूक रोखे हा एक घोटाळा आहे, असे सांगणाऱ्या पक्षानेच या रोख्यांच्या माध्यमातून पैसा घेतला आहे. त्यामुळे कोणाला याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. निवडणूक रोख्यांची यंत्रणा गेल्या वेळेपेक्षा अधिक चांगली होती. आपल्याला आणखी चांगले काम करण्याची आवश्यकता आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा