31 C
Mumbai
Monday, April 13, 2026
घरक्राईमनामासंजय राऊत धमकीप्रकरणात पाचवी अटक; सुनील राऊत यांच्याशी कनेक्शन असल्यामुळे खळबळ

संजय राऊत धमकीप्रकरणात पाचवी अटक; सुनील राऊत यांच्याशी कनेक्शन असल्यामुळे खळबळ

ठाण्यातून मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आल्यानंतर आता याच प्रकरणात आणखी एकाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. ही या प्रकरणातील पाचवी अटक असून मयूर शिंदे असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्याशीच या मयूर शिंदेचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

संजय राऊत यांना आणि त्यांचे बंधू व आमदार सुनील राऊत यांना एका अज्ञाताने धमकी दिली होती. दोघांनाही जीवे मारण्याची धमकी सदर व्यक्ती फोनवरून देत होती. सुनील राऊत आणि फोन करणाऱ्या व्यक्तीमधील संवादाची क्लिप सुनील राऊत यांनी मीडियाला उपलब्ध करून दिली होती. पण आता या प्रकरणात पाचव्या व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर त्याचा म्हणजे मयूर शिंदेचा संबंध सुनील राऊत यांच्याशीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मयूर शिंदे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ताही आहे. त्याला त्याच्या ठाणे येथील कार्यालयातून अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

वरिष्ठांचा त्रास; आत्महत्येआधी दलित युवकाने केली पोस्ट

न्यूझीलंडची अर्थव्यवस्था मंदीत!

सोसायटीच्या आवारात लुंगी आणि गाउन घालून फिरू नका!

शिंदे फडणवीसांमध्ये काही पेटलंय का?

तुझा नऊ वाजताचा भोंगा बंद कर नाहीतर गोळ्या घालीन अशी धमकी या व्यक्तीने फोनवरून सुनील राऊत यांना दिली होती. त्याची क्लिपही नंतर व्हायरल करण्यात आली होती. यासंदर्भात नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. मयूर शिंदे हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे. त्याचा सुनील राऊत यांच्याशी नेमका काय संबंध आहे, याचा तपास आता पोलिस करण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा