अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांना एका बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग ऍपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात २२ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, ३९ वर्षीय उथप्पा यांना 1xBet नावाच्या प्लॅटफॉर्मशी संबंधित प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी त्यांना २२ सप्टेंबर रोजी साक्ष देण्यासाठी हजार राहण्यास सांगण्यात आले आहे.
रॉबिन उथप्पा हे दिल्लीतील या प्रकरणात आतापर्यंत समन्स बजावण्यात आलेले तिसरा माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. तपास यंत्रणेने गेल्या काही आठवड्यात माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांचीही चौकशी केली आहे. सोमवारी या प्रकरणात माजी तृणमूल काँग्रेस खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांचा जबाबही नोंदवण्यात आला. बंगाली अभिनेता अंकुश हाजरा मंगळवारी या प्रकरणात त्यांच्या समन्सवर ईडीसमोर हजर झाला, तर 1xBet इंडियाची ब्रँड ऍम्बेसेडर आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला नियोजित तारखेला हजर झाली नाही, अशी माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींची पहिली भेट कशी होती?
… म्हणून ट्रम्प ‘न्यू यॉर्क टाईम्स’वर मानहानीचा खटला दाखल करणार!
आसाम सिव्हिल सर्व्हिसमधील महिला अधिकाऱ्याच्या घरावर छापे
डेहराडूनमध्ये ढगफुटी, दोघे बेपत्ता; मुसळधार पावसात वाहने आणि दुकाने वाहून गेली!
संबंधित चौकशी ही बेकायदेशीर बेटिंग ऍप्सशी संबंधित आहे, ज्यांच्यावर अनेक लोक आणि गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा किंवा मोठ्या प्रमाणात कर चुकवल्याचा आरोप आहे. कंपनीच्या मते, 1xBet ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बुकमेकर आहे, जी १८ वर्षांपासून सट्टेबाजी उद्योगात कार्यरत आहे. कंपनीच्या मते, या ब्रँडचे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टा लावू शकतात आणि कंपनीची वेबसाइट, ऍप ७० भाषांमध्ये उपलब्ध आहेत. मात्र, आता भारतात ऑनलाइन रिअल मनी आधारित गेमवर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर, अशा प्रकरणांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.







