35 C
Mumbai
Saturday, February 21, 2026
घरक्राईमनामारोहित शेट्टी गोळीबार प्रकरण: हरियाणातून मुख्य शूटरसह चौघे गजाआड

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण: हरियाणातून मुख्य शूटरसह चौघे गजाआड

अटक आरोपींची संख्या ११ वर

Google News Follow

Related

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. हरियाणा स्पेशल टास्क फोर्सच्या (STF) मदतीने केलेल्या संयुक्त कारवाईत पोलिसांनी मुख्य शूटरसह चार आरोपींना बहादूरगड येथून बेड्या ठोकल्या आहेत. या ताज्या कारवाईमुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता ११ झाली आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरूनच हा गोळीबार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ३१ जानेवारी २०२६ च्या रात्री रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करून चित्रपटसृष्टीत दहशतीचे वातावरण निर्माण करणे आणि खंडणी उकळणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. रितिक यादव, दीपक, सनी आणि सोनू.आग्रा आणि नोएडा (उत्तर प्रदेश) येथे राहणारे आहेत.या चौघांकडून मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींविरुद्ध ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. याशिवाय भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि हत्यार कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलीस ठाण्यातून हा तपास आता गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाकडे सोपवण्यात आला आहे.

हे ही वाचा:
आरबीआयच्या कडक कर्ज नियमांचा शेअर बाजाराला फटका

चीनच्या सिचुआनमध्ये अण्वस्त्र सुविधांचा होतोय विस्तार

महाशिवरात्रीनिमित्त इशा फाऊंडेशनच्या कार्यक्रमात तमन्ना भाटियाने धरला ठेका

एसआयआरमध्ये घोळ; बंगालमध्ये सात अधिकाऱ्यांना हाकलले

अटक करण्यात आलेल्या चौघांना सोमवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी उत्तर प्रदेश आणि हरियाणा एसटीएफची मोलाची मदत लाभली असून, या टोळीचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा