30 C
Mumbai
Sunday, April 26, 2026
घरक्राईमनामामुंबईत चार बांगलादेशी घुसखोरांना अटक

मुंबईत चार बांगलादेशी घुसखोरांना अटक

कुरार पोलिसांची मोठी कारवाई

Google News Follow

Related

मुंबई: मुंबईतील मालाड पूर्व भागात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना कुरार पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून, त्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रफीक मुजावर आणि ए.टी.सी. पथक हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. मालाड (पूर्व) येथील पठाणवाडी, कुरारगाव परिसरातील ‘हुमेरा पार्क गार्डन’ आणि ‘तुबा हॉटेल’ परिसरात काही बांगलादेशी नागरिक येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी या परिसरात सापळा लावून संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या इसमांनी आपली खरी नावे आणि पत्ता सांगितला. हे सर्वजण सध्या वसई (पश्चिम), जि. पालघर येथील कोळीवाडा भागात राहत होते.
हे ही वाचा:
पाकिस्तानात दुचाकीवर लागल्या सळ्या; मांज्यापासून सुरक्षेसाठी अजब उपाय

टी२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वी कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती सिद्धिविनायकाच्या चरणी

सोन्याच्या दरात चढउतार, चांदी दबावात

अमेरिकेने २५% अतिरिक्त टॅरिफ केला रद्द

तुहिनूर जॉयल सरदार (३०,मूळ गाव: हुलुहुलीया, जि. सातखीरा, बांगलादेश), मोहम्मद अब्दुल मोमीन मोहम्मद लतीफ सरदार (५२,मूळ गाव: छोटा पोडौलीया, जि. जेसोर, बांगलादेश), नजरुल इस्लाम शोर अली बिश्वास (४१,मूळ गाव: उत्तर दिगोंग, जि. सातखीरा, बांगलादेश), मोहम्मद इमामुल हक मोहम्मद तैबुर रहेमान (४६,मूळ गाव: बैसा, जि. जेसोर, बांगलादेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांचे नावे आहेत.
पोलिसांनी केलेल्या झडतीत या आरोपींकडे बांगलादेशचे कायम रहिवासी प्रमाणपत्र, नागरिकत्व प्रमाणपत्र आणि बांगलादेश नॅशनल आयडी कार्ड आढळून आले आहेत. तपासात ते बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांना भारतातून हद्दपार करण्यासाठी कायदेशीर ‘रिस्ट्रिक्शन ऑर्डर’ प्राप्त करून पुढील कारवाई केली जात आहे.
ही कारवाई उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त आणि समता नगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पो.उ.नि. रफीक मुजावर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा