32 C
Mumbai
Saturday, February 7, 2026
घरक्राईमनामाराजस्थान बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी मारली चितेत उडी

राजस्थान बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी मारली चितेत उडी

१४ वर्षीय मुलीवर बलात्कारानंतर कोळशाच्या भट्टीत मृतदेह जाळण्यात आला

Google News Follow

Related

राजस्थानमधील भिलवाडा येथे १४ वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि नंतर तिला जाळून मारण्याच्या घटनेनंतर तिच्या वडिलांनी या मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना चितेत उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाले पण त्यांच्या प्रकृतीला आता धोका नाही, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

 

या मुलीच्या शरीराचे अवयव कोळशाच्या भट्टीत सापडले होते. २ ऑगस्टपासून ही मुलगी बेपत्ता होती. त्या मुलीच्या या अवयवांवर अंत्यसंस्कार करताना वडिलांनी चितेत उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासनाच्या महात्मा गांधी रुग्णालयाचे संचालक डॉ. अरुण गौर यांनी सांगितले की, तिच्या वडिलांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. या प्रकरणात आता पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

राममंदिरासाठी बनवले विक्रमी ४०० किलो वजनाचे कुलूप

मणिपूरमध्ये केंद्राकडून अतिरिक्त ८०० जवान रवाना

ठाकरेंच्या ‘मातोश्री’ बंगल्यात आढळला विषारी कोब्रा!

ऑस्कर विजेता माहितीपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’मधील कलाकारांचे पैसे बुडवले?

प्रकरण काय आहे?

य़ा मुलीचा खून करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह कोळशाच्या भट्टीत जाळण्यात आला. स्थानिकांचे म्हणणे होते की, या मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. यासंदर्भात जेव्हा पोलिसांनी शोध घेतला तेव्हा तिचा अर्धवट जळालेला मृतदेह या कोळशाच्या भट्टीत सापडला.

 

ही मुलगी शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेलेली असताना तिच्यावर हा बलात्कार झाला. आरोपींनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करून तिचा मृतदेह जाळला. तिच्या शरीराचा काही भाग हा कोळशाच्या भट्टीत जाळण्यात आला तर काही भाग हा जवळच्या तलावात टाकण्यात आला. जेणेकरून पुरावे नष्ट करता येतील. या प्रकरणात १० जण सामील असल्याचे समोर आले आहे. त्यात ४ महिलांचाही समावेश असल्याचे कळते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा