कोइम्बतूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. १९९६ कोइम्बतूर बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. सादिक राजा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जवळजवळ तीन दशके फरार राहिल्यानंतर त्याला विजयपुरा शहरातून अटक करण्यात आली. या कारवाईमुळे कोइम्बतूर पोलिसांचे कौतुक केले जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
मूळचा चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेटचा रहिवासी असलेला आरोपी सादिक स्फोटानंतर फरार होता आणि वारंवार त्याचे लपण्याचे ठिकाण बदलत राहिला. तो तामिळनाडूहून बेंगळुरू, नंतर हुबळी येथे गेला आणि शेवटी विजयपुरा येथे स्थायिक झाला. गेल्या १२ वर्षांपासून तो बनावट ओळखपत्रासह तेथे राहत होता आणि भाजी विक्रेता म्हणून काम करत होता. त्याचे हुबळी येथील एका महिलेशी लग्नही झाले आहे.
हे ही वाचा :
पाकिस्तानातसुद्धा ओळखपत्रे तपासले आणि ९ जणांना घातल्या गोळ्या!
लॉर्ड्समधलं गौरवस्थान: सचिन तेंडुलकरचं चित्र एमसीसी संग्रहालयात झळकणार!
मॉस्कोमध्ये ‘भारत उत्सव’ची भव्य सुरुवात, सर्वत्र भारतीय संस्कृतीची अनोखी झलक
पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की आरोपी सादिक मदुराई आणि नागोर घटनांसह इतर बॉम्बस्फोट प्रकरणांमध्येही सहभागी होता. कोइम्बतूर पोलिसांनी विशिष्ट माहितीच्या आधारे कारवाई केली आणि ही कारवाई अत्यंत गुप्त ठेवली, विजयपुरा जिल्हा पोलिसांनाही कळवले नाही. आता त्याला ताब्यात घेण्यात आले आहे आणि पुढील चौकशीसाठी तामिळनाडूला नेण्यात आले आहे. तसेच पोलीस अधिक तपासात गुंतले आहेत.







