27 C
Mumbai
Monday, February 9, 2026
घरक्राईमनामालखनऊमध्ये लव्ह जिहादच्या प्रकारानंतर खळबळ; यासिनने केला पत्नी शिवाचा खून

लखनऊमध्ये लव्ह जिहादच्या प्रकारानंतर खळबळ; यासिनने केला पत्नी शिवाचा खून

Google News Follow

Related

जिहादची एक भयानक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. जिथे एका विवाहित मुस्लिम पुरुषाने हिंदू महिलेशी लग्न केले आणि नंतर तिची हत्या केली. काल सायंकाळी उशिरा लखनऊच्या पारा भागातील काशीराम कॉलनीत ही हत्या घडली.

आयुर्वेदिक औषधाचा पुरवठादार मोहम्मद यासीन याने आपली दुसरी पत्नी झारा खान उर्फ सोफिया (२६) हिची उशीने तोंड दाबून हत्या केली. झारा खान आणि मोहम्मद यासीन दोघेही बहराइचचे आहेत. जुनी काशीराम कॉलनी परिसरातील त्यांच्या घरात ही घटना घडली आहे.

मोहम्मद यासीनने आधी त्याच्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर तीन वर्षांच्या मुलीला घराबाहेर सोडून दरवाजा बाहेरून लॉक करून त्याने पळ काढला. झारा ही त्याची दुसरी पत्नी होती जिच्याशी त्याने सहा वर्षांपूर्वी लग्न केले होते. लग्नापूर्वी ती हिंदू मुलगी होती आणि तिचे मूळ नाव शिवा विश्वकर्मा होते. मोहम्मद यासीनशी लग्न केल्यानंतर त्याने तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले होते.

झाराचा भाऊ शरद तिला फोन करत होता पण बऱ्याच वेळा फोन करून उत्तर न मिळाल्याने तो तिच्या घरी गेला. तेव्हा तिची मुलगी घराबाहेर बसून रडत होती. त्यामुळे त्याने घराचा दरवाजा तोडला तेव्हा त्याला त्याच्या बहिणीचा मृतदेह बेडरुममध्ये गादीमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत दिसला. त्याने त्वरित ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा:

‘माझी शिफ्ट संपली’…ऐन प्रवासा दरम्यानच पाकिस्तानी वैमानिकाचा विमान चालवायला नकार

आजपासून अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीशी होणार एकरूप!

…म्हणून दापोलीतली शिवसेनेची सत्ता गेली राष्ट्रवादीकडे!

इंडिया गेटवर नेताजींचा भव्य पुतळा….पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिनची पहिली पत्नी शाहराबानो आहे. शहारबानोशी लग्न केल्यानंतर दोन वर्षांनी यासिनने झारासोबत प्रेमविवाह केला होता. ती हिंदू होती. चार दिवसांपूर्वी शहाराबानो आपल्या मुलासह येथे आली होती. तीही फ्लॅटमध्ये राहात होती. मात्र घटना घडली तेव्हा ती तिथे नव्हती. पोलिसांनी शहारबानोची सुरुवातीला चौकशी केली असता, तिने घटनेची माहिती नाकारली आहे. तिची अधिक चौकशी सुरू आहे. आणि यासिनचा शोध घेण्याचा पर्यंत सुरु आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा