आयआयटी मुंबईतील पवई परिसरातील कॅम्पसमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथील वसतिगृह क्रमांक ०४ मधील खोली क्रमांक जी-४१४७ मध्ये राहणाऱ्या सोहिल राजकुमार सांगवान (वय २०) या २२ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलक भारतासारखेच शत्रू!
मोदी सरकारविरोधात आता ‘कोक्रॉच’, शेतकरी एकत्र
‘दगडांनी भरलेला ट्रक’ कट नव्हे; महापालिकेच्या कामासाठीच होता
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा
मिळालेल्या माहितीनुसार, सोहिल हा मटेरियल सायन्सचा (पदार्थ विज्ञान) द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. २८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास त्याने वसतिगृहातील खोलीत पंख्याला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेमुळे कॅम्पसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १९४ नुसार एडीआर (Accidental Death Report) क्रमांक ८३/२०२६ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल नेमके कशामुळे उचलले, याबाबतचे वृत्त अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
