जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; सात दहशतवादी कंठस्नान

सांबा जिल्ह्यात बीएसएफची कारवाई

जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; सात दहशतवादी कंठस्नान

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात अलर्ट दिला असून सुरक्षा यंत्रणाही सज्ज आहेत. भारताकडून वारंवार इशारे देऊनही पाकिस्तानच्या कुरापती सुरूचं आहेत. अशातच जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवारी पहाटे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडल्याची माहिती समोर आली आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवारी पहाटे सीमा सुरक्षा दलाला संशयास्पद हालचाली आढळून आल्या. तेव्हा ही कारवाई करण्यात आली. घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. सात घुसखोरांचा खात्मा करण्यात बीएसएफला यश आले असून जैश-ए-मोहम्मद (जेईएम) शी संबंधित हे सात जण असल्याचा संशय आहे.

हे ही वाचा :

पाकिस्तानला जशाच तसे उत्तर

राफेलला लिंबू-मिरची लावून सैन्याची खिल्ली उडवणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा दाखल!

“आमच्या संयमाची परीक्षा घ्याल तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल”

एकाच वेळी, पाककडून जयशंकर, डोवाल यांचे फूट मसाज आणि युद्धखोरी…

दरम्यान, पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. भारताकडून याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भारतीय सैन्याने एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये एका पाकिस्तानी चौकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करताना दिसत आहे. गुरुवारी, भारताने जम्मू, पठाणकोट, उधमपूर येथील अनेक लष्करी प्रतिष्ठानांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला. ७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या हल्ल्यांच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने हा हल्ला केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले होते.

Exit mobile version