अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल अभद्र टिप्पणी केल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शाई फासली. प्रवीण गायकवाड यांच्या या विधानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात टीका होत असताना गायकवाड हे अक्कलकोटमध्ये आले होते, त्यावेळेस ही घटना घडली.
गायकवाड हे एका कार्यक्रमासाठी तिथे आलेले असताना आयोजक त्यांचे हलगीच्या तालावर स्वागत करत होते, तेव्हाच शिवधर्मचे कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गायकवाड यांच्यावर काळी शाई ओतली.
संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात संभाजी हा एकेरी शब्द वापरल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. तिथे धर्मवीर संभाजी असे नाव हवे अशी मागणी अनेकांनी केली आहे. त्यातूनही हा राग व्यक्त झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात सोलापूरमध्ये शिवधर्म संघटनेने मोर्चाही काढला होता.
हे ही वाचा:
शाहजहांपूरमध्ये कासिब पठाण बनला शिव वर्मा, हिंदू तरुणीवर बलात्कार, ब्लॅकमेल!
इजरायली हल्ल्यादरम्यान ईराणी राष्ट्राध्यक्ष जखमी ?
कावड यात्रा आध्यात्मिक नाही तर शिस्तीचंही प्रतीक
ही शाईफेक दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत महाराष्ट्रात विविध ठिकाणांहून टीका होत आहे. तर अनेकांनी या घटनेचे समर्थनही केले आहे.
मागे ज्ञानेश महाराव यांनी एका कार्यक्रमात जिथे स्वतः शरद पवारही उपस्थित होते, त्यावेळी श्री स्वामी समर्थांवर अत्यंत खालच्या भाषेत टिप्पणी केली होती. त्यावरूनही जनक्षोभ उसळला होता. तसेच वक्तव्य प्रवीण गायकवाड यांनी केल्यानंतर त्यांना अशा पद्धतीने धडा शिकविण्याचा इरादा काही लोकांनी बाळगल्याचे बोलले जात होते.
