बांगलादेश: शाह आलमकडून सहावीत शिकणाऱ्या हिंदू मुलीवर बलात्कार!

बुरखा घालून पळून जाताना स्थानिकांनी पकडले 

बांगलादेश: शाह आलमकडून सहावीत शिकणाऱ्या हिंदू मुलीवर बलात्कार!

बांगलादेशात हिंदुंवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. मारहाण, अपहरण, जाळपोळ, हिंदू देवतांच्या मंदिर-मूर्तींची तोडफोड, बलात्कार अशा दररोज घटना घडत आहेत. स्थानिक हिंदूंकडून प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली जात आहे, मात्र सरकारकडून कोणतीही कठोर कारवाई केली जात नाहीये. पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिकेत दिसत आहेत. याच दरम्यान, हिंदुंवरील अत्याचारची आणखी एक घटना समोर येत आहे.

आरोपी इस्लामी मुहम्मद आलमने एका अल्पवयीन हिंदू मुलीवर बलात्कार केला आहे. बांगलादेशच्या रंगपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. रंगपूर जिल्ह्यातील मिठापुकुर येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन हिंदू मुलगी कोचिंग क्लासमधून परतत असताना मुहम्मद आलमने तिला मक्याच्या शेतात ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

हे ही वाचा : 

तुमचा अतूट निर्धार लाखो लोकांना प्रेरणा देईल

न्यू इंडिया को-ओ.बँक घोटाळा, एका राजकीय पक्षाच्या माजी सचिवाच्या भावाला अटक!

सुकांत कदम स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनलमध्ये दुसऱ्या स्थानावर

नागपूर हिंसाचारादरम्यान अंधाराचा फायदा घेत महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग

या घटनेनंतर आरोपी मुहम्मद आलम बुरखा घालून पळून जात होता. याच दरम्यान स्थानकांनी त्याला पकडले. आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येत आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीची प्रकृती गंभीर आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मिठापुकुर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता आरोपी विरोधात कोणती करतात ते पाहावे लागणार आहे.

दरम्यान, युनुस सरकार जगापुढे सांगत आहेत कि बांगलादेशात सर्व जाती धर्मातील लोक सुरक्षित आहेत. मात्र, हिंदुंवरील अत्याचाराच्या दररोज घटना पाहून युनुस सरकारचा चेहरा उघड झाला आहे.

Exit mobile version