बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी लावलेल्या इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) च्या स्फोटात छत्तीसगड पोलिसांच्या जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी) चा एक जवान हुतात्मा झाला आणि तीन जवान जखमी झाले. सोमवारी (१८ ऑगस्ट) सकाळी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात राज्य पोलिसांची तुकडी, डीआरजीचे पथक माओवादविरोधी कारवाईसाठी बाहेर असताना हा स्फोट झाला, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, या स्फोटात डीआरजी जवान दिनेश नाग हे हुतात्मा झाले. या दुर्घटनेत जखमी कर्मचाऱ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यांना जंगलातून बाहेर काढण्यात येत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
माओवादविरोधी ही कारवाई केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ३१ मार्च २०२६ पर्यंत भारत माओवादमुक्त होईल या प्रतिज्ञाचा एक भाग आहे. त्यांनी म्हटले आहे की माओवादाने गेल्या अनेक वर्षांपासून देशातील अनेक प्रदेशांचा विकास रोखला आहे. गेल्या काही महिन्यांत, केंद्र सरकारने त्यांच्यावर सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे, मोठ्या प्रमाणात बक्षीस असलेले अनेक माओवादी ठार झाले आहेत तर अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे.
गेल्या महिन्यात, छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अबुझहमद भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सहा माओवादी मारले गेले. जुलै महिन्यात बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ८ लाख रुपयांचे बक्षीस असलेला एक वरिष्ठ माओवादी नेता सोधी कन्ना मारला गेला.
हे ही वाचा :
अकोल्यात तब्बल १०५ फूट लांबीची २१०० भरण्यांची कावड
लई चुरूचुरू बोलतोय, पण भावकीच कामाला आली !
पाकिस्तान के हिंदुओं की दर्दभरी दास्तान… सिंध फाईल्स भाग- १
ठाण्याच्या मैथिली प्राईडमध्ये स्पॅनिश पाहुण्यांनी रचले दहीहंडीचे थर
शिवाय, जुलैमध्ये सुकमा जिल्ह्यात १.१८ कोटी रुपयांचे सामूहिक बक्षीस असलेल्या २३ माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. शेजारच्या नारायणपूर जिल्ह्यात एकूण २२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे घडले.







