25 C
Mumbai
Tuesday, February 3, 2026
घरक्राईमनामासचिन पाटील नावाने वावरत होता किरण गोसावी

सचिन पाटील नावाने वावरत होता किरण गोसावी

Google News Follow

Related

गुरुवार, २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचा पंच असणाऱ्या किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. २०१८ च्या फसवणुकीच्या गुन्ह्या संदर्भात पुणे पोलिसांमार्फत गोसावीला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली असून यावेळी गोसावीच्या अटके संदर्भातील विस्तृत माहिती समोर ठेवली. फरार असताना किरण गोसावी हा सचिन पाटील नावाने वावरत असल्याची माहिती पुणे पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.

किरण गोसावी याला अटक केल्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजता पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी गोसावीला अटक करतानाच घटनाक्रम उलगडला. किरण गोसावी हा पुण्यातील कात्रज भागातील एका हॉटेलमध्ये उतरला असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी या खासगी हॉटेलवर धाड टाकून किरण गोसावीला अटक केली.

२०१८ च्या फसवणुकीच्या प्रकरणात किरण गोसावी याला अटक करण्यात आले आहे. २०१८ साली गोसावीच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्यानंतर गोसावी हा फरार झाला होता. २०१९ साली गोसावीला पुणे पोलिसांनी वॉन्टेड घोषित केले होते. फरार असताना गोसावी हा सचिन पाटील या नावाने वावरत होता. तर या काळात गोसावीचे वास्तव्य हे जळगाव, हैदराबाद, लखनौ अशा विविध शहरांमध्ये असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.

हे ही वाचा:

‘बुलढाणा अर्बन’ ची आयकर विभागामार्फत चौकशी

“…आपली बहिण”, क्रांति रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र

घोटाळे लपविण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारांची ही ‘ट्रिक’

नवाब मलिक, एनसीबीसंदर्भातील तक्रारींची चौकशी करणार हे चार अधिकारी

आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात गोसावी पंच असल्याची माहिती पुढे आल्यानंतर आणि त्याचा आर्यन खानसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा गोसावीचा तपास केला. त्यासाठी पथक तयार करण्यात आले आणि गोसावीला अटक करण्यात आली. सद्ध्या पुणे पोलिसांमार्फत गोसावीची चौकशी सुरु असून त्याला आज दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तर इतर कोणत्या तपास यंत्रणेला गोसावीचा ताबा हवा असल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताबा देण्याची तयारीही पुणे पोलिसांनी दाखवली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा