26 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरक्राईमनामाकिरण गोसावी लखनौत करणार आत्मसमर्पण

किरण गोसावी लखनौत करणार आत्मसमर्पण

Google News Follow

Related

पुण्यातील फारसबाग पोलीस ठाण्यातील एका गुन्हयात फरार असलेला किरण गोसावी हा उत्तर प्रदेशातील लखनौ पोलीसाकडे लवकरच आत्मसमर्पण करणार असल्याचे त्याने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. किरण गोसावी हा आर्यन खान प्रकरणातील पंच असून त्याचा अंगरक्षक असलेल्या प्रभाकर साईल याने नुकताच त्याच्यावर २५ कोटीची डील केल्याचा आरोप लावला आहे.

कॉर्डिलिया क्रूझ या आलिशान जहाजावर सुरू असणाऱ्या रेव्ह पार्टीवर एनसीबीकडून कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सह ८ जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान एनसीबीने केलेल्या घटनास्थळावर केलेल्या पंचनाम्यात किरण गोसावी सह ९ जण पंच व स्वतंत्र साक्षीदार आहे. आर्यन खान हा एनसीबीच्या ताब्यात असतांना किरण गोसावी याने त्याच्यासोबत सेल्फी काढून स्वतःच्या स्टेट्सवर ठेवल्यानंतर तो सेल्फीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर एनसीबीच्या या पंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावेळी किरण गोसावी हा चर्चेत आला, किरण गोसावी याच्यावर जॉब रॅकेट चालवून तरुणाची फसवणुक केल्याचा गुन्हा पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८मध्ये दाखल आहे. या प्रकरणात त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नव्हती. फरार असलेला किरण गोसावी चर्चेत येताच पुणे पोलिसांचे पथक त्याच्या अटकेची तयारी करीत असताना त्याने महाराष्ट्रातून पळ काढला.

त्याचा शोध सुरू असताना गोसावीचा अंगरक्षक आणि एनसीबीचा पंच असलेला प्रभाकर साईल याने आर्यन खान प्रकरणात रविवारी धक्कादायक खुलासा करून किरण गोसावी याच्यावर आर्यन खान च्या सुटकेसाठी २५ कोटींची मागणी केल्याचा आणि त्यापैकी ८ कोटी समीर वानखेडे याला देण्यात येणार असल्याचा कथित आरोप करून राज्यात खळबळ उडवून दिली.

हे ही वाचा:

उद्यानातल्या खड्ड्यात पडून दोन मुलाचा मृत्यु

‘समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नवाब मलिक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करा’

आयपीएलमध्ये असणार ‘हे’ २ नवे संघ

समीर वानखेडेंच्या चौकशीसाठी एनसीबीची टीम उद्या येणार मुंबईत!

 

किरण गोसावी या आरोपामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्यामुळे आपले काही खरे नसल्याचे बघून त्याने सोमवारी एका हिंदी वृत्तवाहिनीला मोबाईल फोनवर दिलेल्या मुलाखतीत साईलने केलेल्या आरोपाचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला तसेच महाराष्ट्र माझ्या साठी आता सुरक्षित राहिलेला नसल्यामुळे मी लखनौ पोलिसांकडे पुणे प्रकरणात लवकरच आत्मसमर्पण करीत असल्याचे म्हटले आहे.

किरण गोसावी याने अधिकृतपणे लखनौ पोलिसांकडे आत्मसमर्पण केल्यास त्याला पुणे पोलीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेऊन अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा