31 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरक्राईमनामासंतापजनक! दुर्गामातेच्या मूर्तीचे हात ग्राइंडिंग मशिनने तोडले!

संतापजनक! दुर्गामातेच्या मूर्तीचे हात ग्राइंडिंग मशिनने तोडले!

लखनऊ मधील घटना

Google News Follow

Related

गुरुवारी, १० ऑक्टोबर रोजी लखनौच्या कँट पोलीस स्टेशन हद्दीतील नीलमाथा येथे असलेल्या मारी माता मंदिरातील दुर्गादेवीच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आहे. बदमाशांनी ग्राइंडिंग मशिनच्या साह्याने देवीच्या मूर्तीचे हात तोडल्याचे समोर आले आहे. मंदिराचे पुजारी पूजा करण्यासाठी मंदिरात आले असता हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांनी मूर्तीचे हात तोडण्यासाठी ग्राइंडर मशीनचा वापर केला. या घटनेने हिंदू समाज दुखावला आहे. आरोपींचा शोध सुरु आहे. कँटचे एसीपी अभय प्रताप मॉल यांनी सांगितले की, सध्या मंदिरात नवीन मूर्ती ठेवण्यात आली असून प्रकरण शांत झाले आहे. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा : 

शिवाजी मंदिर ट्रस्टवरून महाराव यांची हकालपट्टी करा!

नवी मुंबई विमानतळावर ‘सी-२९५’ आणि सुखोईचे यशस्वी लँडिग!

शांततेचा नोबेल पुरस्कार अण्वस्त्रमुक्त जगासाठी काम करणाऱ्या जपानच्या संस्थेला

दिल्ली पोलिसांची पुन्हा मोठी कारवाई, २००० कोटींचे कोकेन जप्त!

वृत्तानुसार, मूर्तीची विटंबना केल्याने हिंदू समुदायाकडून संताप व्यक्त केला जात आहे. मूर्तीच्या विटंबनाची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात हिंदू समुदाय एकत्र झाला होता. माहिती मिळताच पोलिसांनी मंदिरात पोहोचून परिस्थिती शांत केली. कॅन्ट इन्स्पेक्टर गुरप्रीत कौर यांनी सांगितले की, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा