25 C
Mumbai
Wednesday, December 17, 2025
घरक्राईमनामाअल कायदाच्या दहशतवादी मॉड्यूलची मुख्य हस्तक शमा परवीनला बेंगळुरूत अटक 

अल कायदाच्या दहशतवादी मॉड्यूलची मुख्य हस्तक शमा परवीनला बेंगळुरूत अटक 

गुजरात एटीएसची कारवाई

Google News Follow

Related

गुजरात अ‍ॅन्टी-टेररिझम स्क्वॉड (ATS) ने भारतीय उपखंडातील अल-कायदा (AQIS) शी संलग्न असलेल्या दहशतवादी मॉड्यूलच्या मुख्य षड्यंत्रकर्त्याला अटक केली आहे. शमा परवीन (वय ३०) असे आरोपीचे नाव असून तिला बंगळुरू, कर्नाटक येथून अटक करण्यात आली.

शमा परवीन कोण आहे?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शमा परवीनच हे संपूर्ण दहशतवादी मॉड्यूल कर्नाटकमधून चालवत होती आणि तीच प्रमुख हँडलर होती. ती अल कायदा मॉड्यूलच्या दहशतवादी हालचाली समन्वयित करत होती. २३ जुलै रोजी चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. वय २० ते २५ दरम्यान असलेले हे संशयित गुजरात, दिल्ली आणि नोएडा येथून अटक करण्यात आले. अटक झालेल्यांची नावे मोहम्मद फार्दीन, सैफुल्ला कुरेशी, झीशान अली, मोहम्मद फैय्याज अशी आहेत. हे सर्व सोशल मिडिया अ‍ॅपवरून एकमेकांशी संपर्कात होते आणि त्यांना भारतभरातील महत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याचे आदेश दिले गेले होते.

हे ही वाचा:

‘भाई वीरेंद्र तो मोहरा है, लालू यादव असली चेहरा हैं’

सपा कार्यकर्त्यांनी मौलाना रशिदीना थोबडवले!

प्रणिती शिंदे म्हणतात, ऑपरेशन सिंदूर म्हणजे सरकारचा मीडियातला तमाशा

आपत्कालीन वॉर्डमध्ये डॉक्टर झोपले, रुग्णाचा मृत्यू!

आंतरराष्ट्रीय संबंध आणि कारवायांचे उद्दिष्ट:

याच मॉड्यूलचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुरावे सापडले आहेत. संशयितांनी भारताबाहेरील हँडलर्सशी संपर्क साधला असल्याचेही तपासात समोर आले आहे. प्रमुख ठिकाणी हल्ल्यांची योजना तयार केली जात होती.

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल काय सांगतो?

  • अलीकडील संयुक्त राष्ट्रांच्या ३२व्या विश्लेषणात्मक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, अल-कायदाचा भारतीय उपखंडात हातपाय पसरण्याचा सक्रिय प्रयत्न सुरू आहे.
  • अल कायदाचा नेता ओसामा महमूद याच्या नेतृत्वाखाली ही संघटना जम्मू-काश्मीर, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये ऑपरेशन्स वाढवण्याच्या तयारीत आहे.

गुजरात ATS च्या अलीकडील अ‍ॅक्शनमुळे अल कायदाच्या भारतातील नेटवर्कबाबत गंभीर बाबी समोर आल्या आहेत. शमा परवीनसारखी महिला दहशतवादी मॉड्यूलचा कणा असल्याचे स्पष्ट झाल्याने सुरक्षा यंत्रणांसाठी ही बाब अधिक चिंतेची ठरत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा