22 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरक्राईमनामाजम्मू काश्मीरमध्ये वर्षभरात दीडशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरात दीडशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा

Google News Follow

Related

जम्मूमधील अखनूर सेक्टरमधील कनाचक येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी शुक्रवारी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू- काश्मीर खोऱ्यात एकूण १७१ दहशतवादी ठार केले गेल्याची माहिती त्यांनी दिली.

जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी केलेल्या ट्विटनुसार, या वर्षी एकूण १७१ दहशतवादी चकमकीमध्ये ठार झाले. त्यापैकी १९ दहशतवादी हे पाकिस्तानी तर १५२ हे स्थानिक दहशतवादी होते. २०२१ या वर्षात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकींमध्ये एकूण ३४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, २०२० या वर्षात एकूण ३७ नागरिकांना चकमकींदरम्यान आपला जीव गमवावा लागला होता. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाण शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आल्याचे ते म्हणाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत जवानांचे कौतुक करत, लोकांच्या सेवेत असणाऱ्या जवानांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे.

पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय जवांना मोठे यश मिळाले आहे. जवळपास सर्वच दहशतवादी गंटांच्या मोहरक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही जम्मू काश्मीर खोऱ्यात एकूण १६८ सक्रीय दहशतवादी आहेत. त्यामधे उत्तर काश्मीरमध्ये ६५ त्याशिवाय मध्य काश्मीरमध्ये १६ आणि दक्षिण काश्मीरमध्ये ८७ असे एकूण १६८ सक्रीय दहशतवादी आहेत. १३ डिसेंबर रोजी झालेल्या झेवान दहशतवादी हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. पोलिसांचे दहशतवाद्यांकडे बारीक लक्ष असून, राज्यातील दहशतवादी कारवायांना आळा घालण्याला आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे देखील ते म्हणाले.

हे ही वाचा:

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारची शेतकऱ्यांना खास भेट

नोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी

झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी ‘कोळी परिषद २०२२’ आयोजित

समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?

तसेच जम्मू -काश्मीरमध्ये सध्या अमली पदार्थ्यांच्या तस्करीचे प्रकरणे वाढले असल्याची माहिती देखील यावेळी विजय कुमार यांनी दिली. अमली पदार्थ्यांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस अनेक उपाययोजना राबवत आहोत. आतापर्यंत अमली पदार्थ तस्करी प्रकरणात ८१५ एफआयआर दाखल करण्यात आल्या असून, एकूण १ हजार ४६५ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा