31 C
Mumbai
Sunday, December 28, 2025
घरक्राईमनामाअमली पदार्थ विकणाऱ्या सात जणांच्या मुसक्या आवळल्या

अमली पदार्थ विकणाऱ्या सात जणांच्या मुसक्या आवळल्या

Google News Follow

Related

मुंबई, पुणे, ठाणे हे आता अमली पदार्थ पुरवठा करणारे यांच्यासाठी हक्काचे केंद्र झालेले आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवून अमली पदार्थ अगदी मोकाटपणे विकले जात आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) केलेल्या एका मोठ्या आंतरराज्यीय कारवाईमध्ये गुजरात, मुंबई आणि पुण्यातून सात जणांना टीमने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी या नेक्ससचा किंगपिन, जो नदीम शेख नावाचा पुण्याचा आहे, त्यालाही एनसीबीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेले हे गुन्हेगार प्रामुख्याने मेफेड्रोन आणि इफेड्रिनमध्ये काम करणाऱ्या पुरवठादारांचे होते. टीमने विविध ठिकाणी केलेल्या छाप्यांमधून २.११२ किलो मेफेड्रोन, ३.९ किलो इफेड्रिन आणि ४५ ग्रॅम चरस जप्त केले आहेत. महानगरांमध्ये अनेक जिममध्येही अमली पदार्थ अगदी सर्रास विकले जात आहेत.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या मते, यातील काही पदार्थ मुंबईत बनवून गुजरातला पाठवण्यात आले, जिथे एक व्यापारी राज्यातील श्रीमंत वर्गातील लोकांना ते पुरवत होता. ‘मेफेड्रोनचा रिसीव्हर गुजरातचा रहिवासी इरफान परमार होता. त्याला घटनास्थळी अडवण्यात आले. त्यावेळी ३०० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

हे ही वाचा:

मायलेकराने जीव गमावण्यामागे होते हे खरे कारण…

वृद्ध आईवडिलांना छळणाऱ्या मुलाला न्यायालयाने दिले हे आदेश

मोदींना वाढदिवशी ‘२ कोटींची’ भेट

…आता यांनीही ठेवले १०० कोटींचे ‘टार्गेट’

मुंब्रा येथेही छापा टाकण्यात आला असून, याठिकाणी इब्राहिम इस्माईल जहांगिरसह ८१ वर्षीय साहिल हमीद मुल्ला आजी, जो मुंबईत एमडीचा पुरवठादार आहे, त्याला अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे १.७५ किलो मेफेड्रोन आणि ३.९ किलो इफेड्रीन जप्त करण्यात आले. जप्तीची किंमत सुमारे ६ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. समीर वानखेडे यासंदर्भात म्हणाले की, ‘शहरात आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या औषध जप्तींपैकी ही मोहीम होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा