आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या पठाण खानला राजस्थानमधून अटक

लष्काराची गोपनीय माहिती, व्हिडिओ, फोटो पाठवत असल्याचे निष्पन्न

आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या पठाण खानला राजस्थानमधून अटक

जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव असताना राजस्थानमधून हेरगिरी प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली असून राजस्थान इंटेलिजेंसने पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या जैसलमेरमधील पठाण खानला (वय ४० वर्षे) अटक केली आहे.

जैसलमेरमधील मोहनगढ भागातून आयएसआय एजंट पठान खान याला अटक करण्यात आली आहे. तो भारतीय लष्काराची गोपनीय माहिती, व्हिडिओ, फोटो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला पाठवत होता. पठान खान हा दीर्घ काळापासून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करत होता.

माहितीनुसार, आरोपी पठाण खान हा २०१३ मध्ये पाकिस्तानला गेला होता आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला होता. पाकिस्तानमध्ये खानला पैशाचे आमिष दाखवून हेरगिरीचे प्रशिक्षण देण्यात आले. २०१३ नंतरही, तो तिथे जाऊन पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांना भेटत राहिला आणि जैसलमेर आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानी हँडलर्सना देत राहिला. पठाण खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

संपूर्ण काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन, ३ हजारांहून अधिक लोक ताब्यात!

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणांवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले

पंकजा मुंडेंना अश्लील संदेश पाठवणाऱ्या एकाला पुण्यातून अटक

राजधानीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

२०१३ मध्ये पाकिस्तानला भेट देणारा खान पाकिस्तानच्या आयएसआयसोबत जवळून काम करत होता. संवेदनशील लष्करी आणि सीमा संबंधित माहिती पुरवत होता. आयएसआय अधिकाऱ्यांशीही तो थेट संपर्कात होता. भारताच्या संरक्षण स्थानांशी संबंधित, विशेषतः जैसलमेर आंतरराष्ट्रीय सीमेभोवतीचा महत्त्वाचा डेटा तो शेअर करत होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमेवर बीएसएफ, लष्कर आणि पोलिसांच्या हालचाली वाढल्या आहेत. बीएसएफचे जवान कठोर पहारा देत असून या परिस्थितीत पाकिस्तानी गुप्तहेर पकडला गेल्यानंतर गुप्तचर संस्था अधिक सतर्क झाल्या आहेत.

Exit mobile version