27 C
Mumbai
Sunday, February 8, 2026
घरक्राईमनामापोटच्या मुलीवर अत्याचार करणारा नराधम बाप अटकेत

पोटच्या मुलीवर अत्याचार करणारा नराधम बाप अटकेत

डीएनए चाचणीमुळे फुटले बिंग

Google News Follow

Related

मुंबईमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय मूकबधिर आणि मानसिक आजारी तरुणीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधम बापाला मुंबई पोलिसांनी गुरुवारी अटक केली. फॉरेन्सिक अहवाल आणि डीएनए चाचणीच्या निष्कर्षांनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पीडित तरुणीला सप्टेंबर २०२५ मध्ये पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिच्या आजीने तिला शहरातील कामा अँड अल्ब्लेस रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय तपासणी दरम्यान, ही तरुणी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. तरुणी बोलू शकत नसल्याने आणि तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याने रुग्णालयाने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

हे ही वाचा:

ट्रॉफी कोण उचलणार? डब्ल्यूपीएल फायनलमध्ये दिल्ली–आरसीबी आमनेसामने

दुकानदाराकडून लाच घेताना पालिका अधिकाऱ्यांना पकडले

तिरुवनंतपुरमच्या भाजप नगरसेवकांसाठी पंतप्रधान मोदींकडून ‘मेजवानी’

२ अब्ज डॉलरचे कर्ज ३० दिवसांत फेडा, यूएईने पाकिस्तानचे कान पिळले

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासाचा भाग म्हणून पीडित तरुणीच्या वडिलांसह परिसरातील सुमारे १६ संशयित पुरुषांचे रक्ताचे नमुने आणि डीएनए गोळा करण्यात आले. गर्भातील भ्रूणाच्या अनुवांशिक सामग्रीशी या नमुन्यांची तुलना करण्यात आली.
२७ जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक वास्तव समोर आले. या सर्व नमुन्यांपैकी केवळ तिच्या वडिलांचा डीएनए पॉझिटिव्ह आढळला.

सुरुवातीला समुपदेशनादरम्यान पीडितेने इतर काही व्यक्तींनी तिच्यावर हल्ला केल्याचे सांगितले होते. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका पुरुषाला आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. मात्र, डीएनए अहवालाने मुख्य आरोपी तिचा पिताच असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांच्या अंदाजानुसार, लैंगिक अत्याचाराची ही घटना गेल्या वर्षी मार्च ते २१ सप्टेंबर दरम्यान घडली असावी.

“फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा