वरळीतील सी-लिंक आणि कोस्टल रोडच्या कनेक्टिंग पॉईंटवर मंगळवारी (९ सप्टेंबर) सकाळी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या (व्हीआयपी) बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या दोन पोलिसांना भरधाव मोटारीने जोरदार धडक दिली. या अपघातात पोलीस हवालदार दत्तात्रय कुंभार यांचा मृत्यू झाला असून त्यांची सहकारी महिला पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाली आहे. जखमी अंमलदार यांच्यावर सध्या वोकार्ड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इस्राईलचे मंत्री मुंबई भेटीस येणार असल्याने वरळी पोलीस ठाण्यातील हवालदार कुंभार व महिला अंमलदार यांना सकाळी बंदोबस्त ड्युटीसाठी नियुक्त करण्यात आले होते. यावेळी भरधाव वेगात आलेल्या मोटारीने दोघांना चिरडले. तात्काळ सहकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी वोकार्ड रुग्णालयात हलवले. मात्र कुंभार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी वरळी पोलिसांनी संबंधित मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास आणि चौकशी सुरु आहे.
हे ही वाचा :
मौलाना आझाद मेडिकल कॉलेजला बॉम्बने उडवण्याची धमकी
वैश्विक टपाल क्षेत्र बळकटीसाठी भारताचे काय आहे पाउल ?
पंतप्रधान मोदी यांचा पंजाब दौरा कौतुकास्पद
भोपाळमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक







