30 C
Mumbai
Sunday, February 8, 2026
घरक्राईमनामासंतापजनक प्रकार- मालवणीतील नशामुक्ती केंद्रात अल्पवयीन मुलींवर नराधमांचा अत्याचार

संतापजनक प्रकार- मालवणीतील नशामुक्ती केंद्रात अल्पवयीन मुलींवर नराधमांचा अत्याचार

संचालकासह चौघांवर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा

Google News Follow

Related

मुंबई : मालाडमधील मालवणी परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नशामुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर संस्थेच्या संचालकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील एका मुलीचा गर्भपात केल्याचा आरोप संस्थेच्या महिला संचालिकेवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चारही आरोपींचा शोध सुरू आहे.

मानखुर्द परिसरात राहणारी १६ वर्षांची पीडित मुलगी मालवणीतील एका नशामुक्ती केंद्रात दाखल होती. २४ जानेवारी २०२४ ते ६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संस्थेचा संचालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी तिच्यावर आणि तिच्या एका मैत्रिणीवर अत्याचार केले. संचालकाने दोन्ही मुलींना धमकावून त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला.
काही दिवसांनी पीडित मुलगी गरोदर असल्याचे लक्षात येताच तिने ही माहिती संस्थेच्या महिला संचालिकेला दिली. या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी संचालिकेने मुलीला तपासणीसाठी नेले आणि तिला औषधे देऊन बेकायदेशीररीत्या तिचा गर्भपात घडवून आणला.
हे ही वाचा:
भारतीय विद्यार्थी आता अमेरिकेऐवजी युरोपकडे

“आसिम मुनीर आणि मी जगभर पैसे मागण्यासाठी जातो, तेव्हा लाज वाटते”

पूर्व कांगोतील कोल्टन खाण कोसळली

आत्मनिर्भरतेकडे भारताचे पाऊल! देशात L410 NG विमानाची निर्मिती होणार?

केवळ संचालकच नव्हे, तर केंद्रातील इतर दोन कर्मचाऱ्यांनीही या मुलींशी अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग केला. इतकेच नाही तर इतर पुरुषांनाही मुलींशी गैरवर्तन करण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अत्याचारानंतर मुलींना जबरदस्तीने आंघोळ करण्यास लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला जात असे.
या सततच्या छळाला कंटाळून अखेर पीडित मुलीने हिंमत एकवटली आणि गुरुवारी मालवणी पोलीस ठाणे गाठून आपल्यावर ओढवलेला प्रसंग पोलिसांना सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संस्थेचा संचालक,महिला संचालिका,दोन कर्मचारी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेनंतर चारही आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी विशेष पथके तैनात केली आहेत. या घटनेमुळे स्थानिक परिसरात प्रचंड संतापाची लाट असून नशामुक्ती केंद्रांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा