डिजिटल अरेस्ट ठगीतील सहा आरोपींचे चीन, कंबोडिया कनेक्शन

आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग असल्याचा उलगडा

डिजिटल अरेस्ट ठगीतील सहा आरोपींचे चीन, कंबोडिया कनेक्शन

मुंबईतील सर्वात मोठ्या डिजिटल अरेस्ट ठगी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींबाबत पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे सर्व आरोपी एका आंतरराष्ट्रीय डिजिटल फ्रॉड सिंडिकेटचा भाग असून त्यांचा थेट संबंध चीनमधील एका कंपनी आणि कंबोडियातील टाइम झोन नेटवर्कशी असल्याचे उघड झाले आहे.

या सिंडिकेटचे संचालन भारतात गुजरातमधील अंकित शाह नावाचा व्यक्ती करत होता. शाह हा थेट चीनी कंपनी आणि कंबोडियन नेटवर्कच्या संपर्कात असून त्याच्या निर्देशानुसार हे आरोपी देशभरात सायबर ठगीचे रॅकेट चालवत होते. या फ्रॉड नेटवर्कचे कामकाज परदेशातील टाइम झोनच्या वेळेनुसार रचले जात होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

मुंबईतील आरए के मार्ग पोलीस ठाण्यात २५ सप्टेंबर २०२५ रोजी डिजिटल अरेस्ट ठगीचा एक मोठा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आदित्य बिर्ला ग्रुपचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर यांची या टोळीने तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणात तपासादरम्यान पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र सायबर सेलने या प्रकरणातीलच काही आरोपींना दुसऱ्या डिजिटल अरेस्ट केससंदर्भात आरए के मार्ग पोलिसांच्या ताब्यातून घेतले. त्यात अब्दुल खुल्ली (४७, रहिवासी पठाणवाडी, मालाड), अर्जुन कडवासरा (५५, स्टील व्यापारी, चिरा बाजार) आणि जेठाराम कडवासरा (३५, रहिवासी भडकमकर रोड, मुंबई सेंट्रल) या आरोपींचा समावेश आहे.

हे ही वाचा : 

पाक संरक्षण मंत्री म्हणतात, दोन आघाड्यांवर युद्धासाठी तयार!

कॅनडा, अमेरिकेतील विमानतळांवर सायबर हल्ला; हमास समर्थनार्थ संदेश प्रसारित

दिवाळी : भारतातील नव्हे जगभरातील नीतिमूल्यांचा, श्रद्धांचा उत्सव !

उलटे स्वस्तिक बनविणाऱ्या भक्तांच्या मनोकामना होतात पूर्ण

या आरोपींच्या चौकशीत एक नवीन प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये ७२ वर्षीय व्यावसायिकाला तब्बल ५१ दिवस डिजिटल अरेस्ट करून त्याच्याकडून ५८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. तपासादरम्यान उघड झाले की, आरोपी अब्दुल खुल्ली सप्टेंबरच्या अखेरीस गुजरात आणि राजस्थानला गेला होता, जेणेकरून पैशांच्या ट्रान्सफरसाठी नवे चॅनेल तयार करता येतील. या टोळीची मॉडस ऑपरेंडी अत्यंत चलाख होती. आरोपी स्वतःला एटीएस, एनआयए किंवा ईडीचे अधिकारी म्हणून सादर करत आणि लोकांना डिजिटल अरेस्ट करून त्यांच्या खात्यातील पैसे उकळत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हा गट भारतातील अनेक नागरिकांना अशाच प्रकारे फसविण्याची योजना आखत होता.

Exit mobile version