30 C
Mumbai
Saturday, November 15, 2025
घरधर्म संस्कृतीदिवाळी : भारतातील नव्हे जगभरातील नीतिमूल्यांचा, श्रद्धांचा उत्सव !

दिवाळी : भारतातील नव्हे जगभरातील नीतिमूल्यांचा, श्रद्धांचा उत्सव !

सांस्कृतिक ओळखीमुळे दिवाळीच्या संदेशाला मूळ भूमीपासून दूर रुजविण्याची संधी

Google News Follow

Related

दिवाळी हा आता केवळ भारतीय सण राहिला नाही; तो आज जगभर साजरा होणारा एक Hindu festival of light, hope and dharma बनला आहे. बालीच्या किनाऱ्यांवर झगमगणारे दिवे, नेपाळच्या पर्वतरांगांत गुंजणारे भजन, मॉरिशसच्या गल्लीबोळांत फुलणाऱ्या रांगोळ्या आणि लंडनमधील लक्ष्मीपूजन या सर्व ठिकाणी भारतीय संस्कृतीचा सुवास पसरलेला दिसतो. हा सण श्रद्धा, कुटुंबमूल्ये आणि नीतिमूल्यांच्या एकतेचा उत्सव आहे.दीपक / दिवा हा अंधार, अन्याय आणि अज्ञान यांचा नाश करतो. त्याचप्रमाणे दिवाळी प्रकाशाचा आणि धर्माच्या विजयाचा सण. आज भारताबरोबर इतर देशांत आनंदाने साजरा केला जातो; आणि म्हणूनच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पाहिले, तरी त्या प्रत्येक दिव्यामागे भारताच्या संस्कृतीचा एक किरण झळकताना दिसतो.
बाली, नेपाळ, मॉरिशस आणि त्रिनिदाद हे देश आज ही आजही दिव्यांच्या प्रकाशाने उजळतात. कारण दिवाळी हा सण भारताप्रमाणेच जगभरात साजरा केला जातो. दिवाळी भारताच्या संस्कृतीचा, अध्यात्माचा आणि मानवी एकतेचा उत्सव आहे. तिचा हा जागतिक प्रसार भारताच्या कालातीत सॉफ्ट पॉवरचे जिवंत उदाहरण आहे.
दिवाळी, दिव्यांचा सण, जगभरातील अब्जाहून अधिक लोक साजरा करतात, ज्यामुळे तो जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांपैकी एक ठरतो. हा सण म्हणजे एक जिवंत परंपरा आहे, जी तिच्या जागतिक प्रसारातून सांस्कृतिक अभ्यासासाठी एक महत्त्वाचा दृष्टिकोन देते. सणाची लवचिकता आणि आशा व नीतिमत्तेच्या सार्वत्रिक संकल्पनांवर आधारित पाया यामुळे तो विविध देशांमध्ये रुजला. भारतीय संस्कृती इतकी सुंदर आणि प्रभावशाली आहे की दूरवरच्या देशांनीही तिला आपले मानले आहे. या सणाचा प्रसार दाखवतो की भारतीय संस्कृती आपल्या मूळ मूल्यांना जपत, जगाशी संवाद साधताना आपल्या भूमीतील प्रकाश चहूकडे पसरवत पुढे जाते.
भारतातील दिवाळी
दिवाळी’ हे नाव संस्कृतमधील ‘दीपावली’ या शब्दावरून आले आहे. म्हणजेच ‘दिव्यांची रांग’. हा फक्त प्रकाशाचा उत्सव नसून अंधारावर प्रकाशाचा, दुष्ट प्रवृत्तींवर सद्गुणांचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय आहे. काळाच्या प्रवाहात दिवाळीने अनेक सांस्कृतिक अर्थ आत्मसात केले आहेत. म्हणूनच हा सण आज प्रत्येक समाज आपल्या परंपरा, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा प्रकाश सहजपणे गुंफू शकतो.हिंदू धर्मात, दिवाळीला संस्कृतिक आणि पौराणिक महत्व लाभलेले आहे. उत्तर भारतात, दिवाळी मुख्यतः रामायणाशी जोडली जाते. या दिवशी रावणावर भगवान रामाचा विजय साजरा केला जातो आणि सीता व लक्ष्मणासह अयोध्येत परतल्याचा आनंद व्यक्त केला जातो. त्या आनंदात अयोध्यावासीयांनी घराघरात दिवे लावून आपल्या नीतिमान राजाचे स्वागत केले आणि आजही आपण त्याच परंपरेचे अनुकरण करतो.दक्षिण भारतात दिवाळी मुख्यतः भगवान कृष्णाने राक्षस नरकासुरावर मिळवलेला “विजय दिवस” म्हणून साजरी केली जाते. यामधून वाईट प्रवृत्तीवर चांगल्याप्रवृत्तीचा विजय अधोरेखित होतो विजय याची प्रचिती होते. अनेक समाजांमध्ये, विशेषतः पश्चिम भारतात, दिवाळी देवी लक्ष्मीशी जोडलेली आहे. तो तिचा वाढदिवस, भगवान विष्णूशी विवाहाचा दिवस किंवा समुद्र मंथनातून तिचा प्रकट झाल्याचा दिवस मानला जातो. व्यापारी समुदायांसाठी हा दिवस नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात, जुनी खाती मिटवणे आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्याचा खास क्षण असतो. तसेच, पूर्व भारतात, विशेषतः बंगालमध्ये, लोक काली मातेची आराधना करतात. ही शक्तिशाली देवी राक्षसांपासून जगाचे रक्षण करते, आणि तिचा उत्सव भयाचा नाश व सामर्थ्याचा सण म्हणून साजरा केला जातो.

वाल्मिकी रामायणाचा चिरस्थायी संदेश

रामायणाची कथा तिचा सर्वात प्रभावी आणि जागतिक स्तरावर ओळखला जाणारा आधार बनली आहे. ऋषी वाल्मिकींनी प्रथम रचलेले हे प्राचीन महाकाव्य केवळ एक पौराणिक पार्श्वभूमीच देत नाही; तर ते एक संपूर्ण नैतिक चौकट प्रदान करते, जिची नैतिक स्पष्टता संस्कृतींमध्ये प्रतिध्वनित होते.

रामायणाची खरी ताकद त्याच्या कथानकात नाही, तर त्याच्या सखोल नैतिक शिकवणीत आहे. हे महाकाव्य नातेसंबंधांची कर्तव्ये दाखवते आणि आदर्श व्यक्तिमत्त्वे साकारते, आदर्श पुत्र, भाऊ, पती, सेवक आणि राजा. प्राचीन हिंदू ऋषींच्या शिकवणी कथात्मक रूपाने समोर आणते, जिथे त्याग, भक्ती, निष्ठा आणि चांगुलपणावर कायम राहण्याचे मूल्य सांगितले जाते. रामराज्य रामाच्या नेतृत्वाखाली न्याय, शांतता आणि समृद्धीची स्थिती शतकानुशतके हिंदू विचारात आदर्श शासन व सुसंस्कृत समाजासाठी प्रेरणा देत आले आहे.

रामाने साकारलेला धर्म आणि रावणाने साकारलेला अधर्म यांच्यातली ही स्पष्ट लढाई नैतिकतेची एक शक्तिशाली आणि सार्वत्रिक शिकवण देते. रामायणाचा संदेश केवळ धार्मिक संदर्भापुरता मर्यादित राहत नाही, तर न्याय व सद्गुणांच्या विजयाची मानवी आकांक्षा जगभरातील लोकांपर्यंत पोहोचतो. ही सार्वत्रिक ओळख महाकाव्याच्या ऐतिहासिक प्रसारामुळे अधिक बळकट झाली आहे. रामायण दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये अनेक स्थानिक आवृत्त्यांमध्ये पुन्हा सांगितले गेले आहे.

जसे थायलंडमधील रामकियन, कंबोडियामधील रीमकर आणि इंडोनेशियातील विविध कथांसारख्या रूपांतरणांमध्ये. महाकाव्याची पात्रे आणि त्याची कथा पूर्वीपासूनच असलेल्या सांस्कृतिक ओळखीमुळे दिवाळीच्या संदेशाला मूळ भूमीपासून दूरही रुजविण्याची आणि त्याला व्यापक स्वीकार मिळवून देण्याची संधी मिळते.

भारतातील सीमाभागांमधील दिवाळी :

नेपाळचा तिहार :

नेपाळमध्ये ‘तिहार’ किंवा ‘यमपंचक’ म्हणून ओळखला जातो. तो म्हणूनही प्रसिद्ध आहे, कारण त्याचा संबंध मृत्यूच्या देव यम यांच्या कथेशी आहे. हा सण पाच दिवस चालतो, दशहरानंतर नेपाळमधील दुसरा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. तिहार सणाची खासियत म्हणजे प्राण्यांबद्दल दाखवला जाणारा सखोल आदर. प्रत्येक दिवस विशिष्ट प्राण्यांना जसे की, कावळा, कुत्रा, गाय यांच्या सन्मानासाठी समर्पित असतो. आपल्याला त्या प्राचीन परंपरेची आठवण करून देतो, जिथे मानव, निसर्ग आणि दैवी शक्ती यांच्यातील नात्याचा आदर आणि सन्मान केला जातो. हे वैदिक विचारसरणीत रुजलेल्या निसर्ग-केंद्रित दृष्टिकोनाचे सुंदर उदाहरण आहे.

तिहार सणाची सुरुवात कावळ्यांच्या पूजेने होते हिंदू परंपरेनुसार ते यमराजाचे दूत मानले जातात, म्हणून लोक त्यांना धान्य आणि मिठाई अर्पण करून दुःख आणि नकारात्मकता दूर ठेवण्याची प्रार्थना करतात. दुसऱ्या दिवशी येतो कुकुर तिहार, ज्यात निष्ठा आणि रक्षणाचे प्रतीक असलेल्या कुत्र्यांना माळा, टिका आणि खायला दिले जाते. हा दिवस माणूस आणि प्राण्यांमधील मैत्रीचा सण ठरतो. तिसरा दिवस गाय तिहार आणि लक्ष्मी पूजेचा असतो; गायींना मातृत्व आणि संपन्नतेचे प्रतीक मानून त्यांची पूजा केली जाते, तर संध्याकाळी घरोघरी देवी लक्ष्मीचे स्वागत केले जाते. तिहारचा चौथा दिवशी गोरू पूजा केली जाते. आपल्या शेतीत खांदे देणाऱ्या बैलांचे आभार मानले जातात. गोवर्धन पूजा श्रीकृष्णाच्या त्या दिव्य कृतीची आठवण करून देते, काठमांडू खोऱ्यातील नेवार समाज या दिवशी “म्ह पूजा” करतो. स्वतःच्या आत्म्याला शुद्ध ठेवण्यासाठी आणि निरोगी, आनंदी आयुष्याची प्रार्थना करण्याचा सुंदर विधी. सणाचा शेवट भाई टिकेने म्हणजेच भाऊ आणि बहिणींच्या प्रेमाचा दिवस.

बाली मधील गालुंगन

दिवाळी आणि बालीतील प्रमुख सण गालुंगन आणि कुनिंगन यांच्यात आश्चर्यकारक साम्य आहे. बालिनी पंचांगानुसार दर २१० दिवसांनी साजरा होणारा गालुंगन हा धर्माचा म्हणजेच नीती, सत्य आणि सुव्यवस्थेचा अधर्मावर विजय साजरा करणारा सण आहे. हेच ते तत्त्वज्ञान आहे जे दिवाळीच्या मूळाशी आहे. बालीतील कथांनुसार इंद्र देवाच्या सैन्याने मायादेनावा नावाच्या अधार्मिक राजावर विजय मिळवला. जशी कथा आपल्याकडे रामाच्या रावणावर आणि कृष्णाची नरकासुरावरच्या विजयाची आहे. गालुंगननंतर दहा दिवसांनी येणारा कुनिंगन हा दिवस पूर्वजांच्या आत्म्यांना निरोप देण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादांचा स्वीकार करण्याचा असतो. अशा प्रकारे धर्माचा विजय, प्रकाशाचा उत्सव आणि दैवी आशीर्वाद यांची ही भावना बालीत दिवाळीइतकीच ओळखीची आणि आपुलकीची वाटते.

बालीमध्ये रामायण ही फक्त एक कथा नसून ती लोकांच्या जीवनशैलीचा, श्रद्धेचा आणि कलात्मकतेचा भाग आहे. राम आणि सीतेची गाथा येथे प्रत्येक नृत्यात, प्रत्येक गाण्यात आणि प्रत्येक रंगमंचावर जिवंत आहे. त्यातील सर्वात मोहक म्हणजे केचक नृत्य सूर्यास्ताच्या वेळी उलुवाटू मंदिराच्या अंगणात शेकडो कलाकार “चक-चक-चक” असा तालबद्ध नाद करताना, सीतेचे अपहरण आणि राम-रावण युद्धाची कथा साकारतात. तितकेच सुंदर रामायण बॅले किंवा सेंद्रतारी रामायण हे नृत्यनाट्य आहे, जिथे संगीत, नृत्य आणि नाट्यकला एकत्र येऊन महाकाव्याला दृश्य आणि भावनिक रूप देतात. या कलांमधून दिवाळीचा आत्मा प्रकाशाचा अंधारावर विजय, धर्माचा अधर्मावर विजय बालीच्या संस्कृतीत सहज मिसळलेला दिसतो. इथे विधीपेक्षा मूल्यांना महत्त्व आहे आणि त्या मूल्यांमधून भारताच्या आत्म्याशी जोडलेली एक सुंदर, हृदयस्पर्शी सांस्कृतिक नाळ जिवंत राहिलेली आहे.

हे ही वाचा:

तंदुरी रोटीवर थुंकणाऱ्या अदनानला अटक!

शिल्पा शेट्टी आणि राहुल गांधी यांना वेगळा न्याय का ?

भारत-ऑस्ट्रेलियाचे पाच धुरंधर फलंदाज

‘जटाधरा’चा ट्रेलर लवकरच रिलीज होणार

गिरमिट्यांचा इतिहास आणि दिवाळी

भारतीय करारबद्ध मजुरांच्या गिरमिट्यांच्या वंशजांनी वसवलेल्या देशांतील दिवाळीची कहाणी म्हणजे संस्कृतीच्या सामर्थ्याची आणि मनाच्या जिद्दीची अप्रतिम झलक आहे. या सणाला फक्त आनंद साजरा करण्याचा अर्थ नव्हता; तो घराची आठवण, ओळखीचा आधार आणि कठीण काळात एक आध्यात्मिक आधार होता. पिढ्यानपिढ्या जपलेला हा प्रकाश आता एक भव्य सार्वजनिक उत्सवात बदलला आहे. मॉरिशियस, त्रिनिदाद आणि टोबॅगो, फिजी, गयाना अशा देशांमध्ये दिवाळी लवचिकता, सांस्कृतिक अभिमान आणि बहुसांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक बनली आहे. या सणाचा प्रवास त्या समुदायाच्या स्वतःच्या संघर्ष, मेहनत आणि आशेच्या प्रवासाचे प्रतिबिंब आहे. उसाच्या शेतांपासून ते सत्तेच्या हॉलपर्यंत.

१८३४ ते १९१७ या काळात, ब्रिटिश साम्राज्याने गुलामगिरी संपल्यानंतर आपल्या साखरेच्या मळ्यांमध्ये कामासाठी मोठ्या प्रमाणावर भारतीय मजुरांचे स्थलांतर घडवून आणले. दहा लाखांहून अधिक लोक, मुख्यतः उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूच्या गरीब भागांमधून, कराराखाली दूर देशांमध्ये पाठवले गेले. “गिरमिट्या” हा शब्द या काळाचे स्मरण म्हणून आजही राहिला आहे. इंग्रजी शब्द “अग्रीमेंट” (गिरमिट) च्या उच्चारातून आला आहे.

गिरमिट्यांचा इतिहास बघता त्यांचे जीवन फार कठीण होते, कमी वेतन, कठीण काम, आणि अनोळखी संस्कृतीत जुळवून घेण्याचा संघर्ष. अशा काळातही, त्यांनी आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांना जिवंत ठेवले आहे.

मॉरिशियस: मॉरिशियस हा हिंद महासागरातील एक अनोखा देश आहे, जिथे गिरमिट्यांचे वंशज आता लोकसंख्येचा मोठा भाग आहेत, तर हिंदू नागरिक सुमारे अर्ध्या लोकसंख्येच्या आसपास आहेत. त्यामुळे दिवाळी येथे एक मोठा सार्वजनिक सण म्हणून साजरा केला जातो. सणाच्या पारंपारिक रीती-रिवाजांमध्ये घरे स्वच्छ करणे, देवी लक्ष्मीची प्रार्थना करणे आणि दिव्यांनी घर सजविणे आणि सार्वजनिक जागांवर रोषणाई करणे, म्हणजेच भारत आणि मॉरिशियस मधील दिवाळी सारख्या प्रमाणात साजरी केली जाते.

तरीही, मॉरिशियनपद्धतीने दिवाळीला एक खास स्थानिक रंग मिळाला आहे, विशेषतः खाद्यपदार्थांमध्ये गुलाबजामुन आणि बर्फीसारख्या पारंपरिक मिठाईंसोबत गेटाऊ पॅटेट्स गोड बटाटा आणि नारळापासून बनवलेले तळलेले केक बनविले जातात. जी भारतीय वारसा आणि स्थानिक साहित्याचे सुंदर मिश्रण दाखवते.

त्रिनिदाद आणि टोबॅगो

कॅरिबियनमधील हा देश भारताबाहेरील दिवाळी साजरी होण्याचा सर्वात मोठा, सुंदर आणि संघटित उत्सव म्हणून ओळखला जातो. दिवाळी आता फक्त धार्मिक सण नाही; ती सर्व वंश आणि धर्माच्या लोकांनी एकत्र साजरा केलेला एकतेचा उत्सव बनला आहे. संध्याकाळी, कुटुंबे आणि मित्र घराभोवती, अंगणात, मोकळ्या जागांवर, पायऱ्यांवर आणि नाविन्यपूर्ण आकार आणि विलक्षण डिझाइनमध्ये वाकलेल्या बांबूच्या देठांवर दिवे लावतात. सर्व दिवाळी उत्सवांचे केंद्र त्रिनिदादच्या मध्यवर्ती भागात आयोजित केले जाते जगातील पहिले हिंदू थीम पार्क आहे. जे हिंदू तत्त्वज्ञान आणि इंडो-त्रिनिदादियन संस्कृतीसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून काम करते. ‘दिवाळी नगर’चा प्रभाव इतका आहे की त्याने जगभरातील हिंदू थीम पार्क आणि इतर नगरांना प्रेरणा दिली आहे.

दरवर्षी, एक विशिष्ट थीम निवडली जाते, म्हणजेच एखाद्या महान आध्यात्मिक नेत्याचे जीवन आणि अभ्यागतांना (पर्यटकांना) शैक्षणिक प्रदर्शनांद्वारे सांगितल्या जातात. हा सण समुदायात सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी ओळखला जातो आणि तो एकता, स्वच्छता, सौहार्द आणि उत्सवाने दर्शविला जातो. हा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो जो बहु-सांस्कृतिक, बहु-जातीय आणि बहु-धार्मिक त्रिनिदादियन समाजात राष्ट्राला एकत्र करतो.

दिवाळीचा हा जागतिक प्रवास केवळ एका सणाचा नसून तर भारताच्या आत्म्याचा विस्तार आहे एक असा आत्मा जो धर्म, संस्कृती आणि सभ्यता यांच्या तेजाने उजळलेला आहे. आज जेव्हा बाली, नेपाळ, मॉरिशस आणि त्रिनिदादपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. तेव्हा ती केवळ उत्सवाची नाही तर भारतीय संस्कृतीच्या चिरंतन जिवंतपणाची साक्ष देते.

हीच भारताची खरी सॉफ्ट पॉवर आहे. जी कुठल्याही प्रचाराशिवाय संस्कृतींना जोडते, आणि जगाला “वसुधैव कुटुंबकम्” या वैदिक विचाराचा अर्थ प्रत्यक्ष दाखवते. या उत्सवातून जगभरात रामाच्या विचारांचा आणि आदर्शचा प्रसार होत आहे. अंध:कारात प्रकाश फुलवणारा आणि जगाला धर्म, सत्य आणि प्रेमाच्या मार्गावर नेणारा सण आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा