उत्तराखंडच्या उत्तरकाशी शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये मुस्लिम कारीगर अदनान तंदुरी रोटीवर थुंकत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी अदनानला पोलिसांनी अटक केली असून, संबंधित रेस्टॉरंटचा परवाना देखील रद्द करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
व्हिडीओमध्ये अदनान रोटीवर थुंकत असल्याचे स्पष्ट दिसून आले. व्हिडीओ व्हायरल होताच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते तातडीने रेस्टॉरंटमध्ये पोहोचले आणि संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले.घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप उसळला आणि अनेक लोक रस्त्यावर उतरले. लोकांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
घटनेनंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. खाद्य सुरक्षा आणि मानक अधिनियम २००६ अंतर्गत संबंधित धारांनुसार अदनानवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासोबतच खाद्य सुरक्षा विभागाने संबंधित रेस्टॉरंटचा परवाना रद्द करण्याची कारवाई देखील सुरू केली आहे.
हे ही वाचा :
कॅनडामधील कपिल शर्माच्या ‘कैप्स कॅफे’वर पुन्हा गोळीबार; चार महिन्यांत तिसरा हल्ला!
२० वर्षांपासून मुंबईत राहत होता घुसखोर बांगलादेशी, असा सापडला!
भंगार विक्रेत्याकडून लाच घेणारा पंजाबचा डीआयजी अटकेत
राहुरीचे भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन
तणावाची परिस्थिती लक्षात घेता पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
Massive protests have erupted in Uttrakashi, Uttarakhand after yet another “Thook Jihad” case rocked the state.
At Zaika Restaurant, run by a man from the Muslim community, staff were caught by Bajrand Dal, mixing saliva into rotis — without police verification or hygiene… pic.twitter.com/33X3INnmAV
— Treeni (@TheTreeni) October 16, 2025







