29.4 C
Mumbai
Thursday, May 14, 2026
घरक्राईमनामापाकिस्तान स्थित गँगस्टर भट्टीचे जाळे उद्ध्वस्त; महाराष्ट्रात ४० ठिकाणी एटीएसचे धाडसत्र

पाकिस्तान स्थित गँगस्टर भट्टीचे जाळे उद्ध्वस्त; महाराष्ट्रात ४० ठिकाणी एटीएसचे धाडसत्र

५३ संशयितांची चौकशी सुरू

Google News Follow

Related

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी राज्यभरात मोठी कारवाई करत पाकिस्तानस्थित गुंड शहजाद भट्टीच्या सिंडिकेटवर हल्ला चढवला. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील ४० हून अधिक ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले असून, भट्टीच्या संपर्कात असलेल्या किमान ५३ संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना भडकवून त्यांना देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा भट्टीचा डाव एटीएसने उधळून लावला आहे.

एटीएसच्या पथकांनी बुधवारी पहाटेपासूनच संशयितांच्या ठिकाणांवर छापेमारी सुरू केली होती. यामध्ये प्रामुख्याने खालील शहरांचा समावेश आहे. मुंबई शहर, मीरा रोड (ठाणे) आणि नालासोपारा (पालघर),नाशिक आणि जळगाव,नागपूर आणि अकोला, पुणे आणि नांदेड या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने शहजाद भट्टीच्या मॉड्यूलचा वापर करून भारतात मोठ्या घातपाताचा कट रचला होता. गेल्या आठवड्यात झालेल्या तपासात असे निष्पन्न झाले की, दिल्लीतील एक ऐतिहासिक मंदिर, दिल्ली-सोनीपत महामार्गावरील प्रसिद्ध ढाबा आणि हरियाणामधील एका लष्करी छावणीवर हल्ल्याची योजना आखण्यात आली होती.
“परदेशात बसलेला शहजाद भट्टी सोशल मीडियाचा वापर करून महाराष्ट्रातील तरुणांशी संपर्क साधत होता. त्यांना पैशांचे आमिष दाखवून किंवा चिथावणी देऊन गुन्हेगारी आणि देशविरोधी कृत्यांकडे वळवण्याचा त्याचा प्रयत्न होता,” अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अलीकडेच गँग बस्ट ऑपरेशन २.०’ अंतर्गत ४८२ गुंडांना अटक केली होती. यामध्ये भट्टीच्या नऊ प्रमुख हस्तकांचा समावेश होता. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र एटीएसने राज्यातील संशयितांची यादी तयार केली होती. या आरोपींना उत्तर भारतात सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करणे आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचे काम सोपवण्यात आले होते.एटीएस सध्या या ५३ संशयितांच्या डिजिटल उपकरणांची आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करत असून, या मोहिमेतून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा