30.1 C
Mumbai
Thursday, May 14, 2026
घरक्राईमनामापालघरमध्ये अनधिकृत बांधकाम दाखवणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या

पालघरमध्ये अनधिकृत बांधकाम दाखवणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या

विरारमध्ये घडला भयंकर प्रकार

Google News Follow

Related

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये मंगळवारी एक भयंकर घटना घडली. आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. प्रशासनातील लोकांसोबत खाणीच्या परिसरात गेलेले असताना ही हत्या झाली. त्यामुळे या परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

मंगळवारी दुपारी आत्माराम पाटील हे वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत एका शासकीय कामासाठी शिरगाव येथील खदान परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना ठार करण्यात आले.

आत्माराम पाटील यांच्या भावाच्या मुलाचे दोन दिवसापूर्वी लग्न झाल्यामुले त्यांच्या घरात सत्यनारायणाची पूजा होती. एकीकडे लग्नाचा आनंद घरात होता, दुसरीकडे घरात दुपारी १२ वाजता सत्यनारायणाची पूजा सुरू होती त्याच वेळेत आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून आत्महत्या केली आहे. आत्माराम पाटील हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भालचंद्र पाटील हा विरार पूर्व कडील मोठा आका असून अनेक कुटुंबियांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या असल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. त्यामुळे विरारच्या अक्का वर कडक कारवाही करावी अशी मागणी आत्माराम पाटील यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

हे ही वाचा:

भायखळा गोळीबार प्रकरण उघड

चीन दौऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प, पण स्वागताला शी जिनपिंग नाहीत

सलग पाचव्या विजयासह गुजरात टायटन्स अव्वल, हैदराबाद तिसऱ्या स्थानावर

मतीन पटेलला आलिशान घर बांधून देऊ!

आरोपी भालचंद्र पाटील आणि महेश पाटील यांचा अनधिकृत बंगला, खाण, बेकायदेशीर जमिनी हडप केल्याच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याचा राग मनात होता.  मंडळाधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत आत्माराम पाटील होते. तेव्हाच आत्माराम पाटील यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांचा पाठलाग करत अक्षरश: दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

अशी झाली हत्या

शिरगाव येथील खाणीबाबतीतही अमित चौधरी यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर तहसीलदार यांच्या आदेशावरून मंडलाधिकारी प्रभाकर पाटील पाहणी करण्यासाठी गेले होते. सोबत आत्माराम पाटील होते. मयत आत्माराम पाटील तेथील परिस्थिती दाखवायला गेले असता आरोपींनी रागाच्या भरात त्यांची हत्या केली आहे. ही हत्या १० ते १२ जणांनी केली असून, २ जणांना ताब्यात घेतले आहे तर अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा