28 C
Mumbai
Friday, August 21, 2026
घरराजकारण'धनुष्यबाण चिन्हच आता गोठवा!'

‘धनुष्यबाण चिन्हच आता गोठवा!’

कपिल सिब्बल यांची न्यायालयात अजब मागणी

Google News Follow

Related

शिवसेना नेमकी कुणाची याविषयी सध्या सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. उबाठा शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. त्यातच बुधवारी उबाठा शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या मागणीमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

सिब्बल यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हच गोठवून टाका अशी मागणी केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना त्यांनी ही अजब मागणी केली. एकनाथ शिंदे यांना हे चिन्ह मिळू नये आणि आम्हाला ते मिळणार नसेल तर ते गोठवून टाका अशी ही मागणी आहे.

हे ही वाचा:

इंडिगो विमानात प्रवाशाची प्रकृती बिघडली

सिंधूच्या कठीण काळात विराट ठरला ‘गेमचेंजर’

नाशिकमध्ये डेंग्यूचा थैमान; महापालिका ॲक्शन मोडवर

राहुल गांधी बेहिशोबी मालमत्ताप्रकरणातील दिलासा आभासी की खरा?

शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळा असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी याआधीच्या सुनावणीत केला होता. त्यामुळे, शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे आणि संजय राऊत यांनी अनेकदा व्यक्त केला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल किंवा ते गोठवलं जाईल, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. आता, ठाकरेंचे वकिल कपिल सिब्बल यांनी मोठी मागणी करत चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

सिब्बल यांनी म्हटले आहे की,  ‘शिवसेना’ हे नाव ठाकरे यांचेच आहे आणि शिंदे गटाला ते चिन्ह मिळू शकत नाही, असा निर्णय द्यावा. त्यांनी त्या चिन्हाचा लाभ घेतला आहे, हा चिन्हाचा अनधिकृत वापर करण्याचा प्रकार आहे. जर ते चिन्ह त्यांना मिळू शकत नसेल आणि मलाही मिळू शकत नसेल, तर ते चिन्ह गोठवले गेले पाहिजे.

२१ जून आणि १९ जुलै रोजी परिस्थिती जशी होती, त्याच घटनांचा विचार करणे आवश्यक आहे. त्यानंतर घडलेल्या कोणत्याही गोष्टीचा वापर अशा प्रकारे केला जाऊ शकत नाही ज्यामुळे पक्षांतराला प्रोत्साहन मिळेल. ‘दहाव्या अनुसूची’च्या अर्थाचा हाच मुख्य गाभा आहे,असेही ते म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा