31 C
Mumbai
Wednesday, August 19, 2026
घरस्पोर्ट्ससिंधूच्या कठीण काळात विराट ठरला ‘गेमचेंजर’

सिंधूच्या कठीण काळात विराट ठरला ‘गेमचेंजर’

Google News Follow

Related

कारकीर्दीतील कठीण काळ… अपेक्षित निकाल मिळत नव्हते आणि आत्मविश्वासही डळमळीत झाला होता. अशा वेळी भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ विराट कोहली याचा एक साधा, पण मनाला भिडणारा सल्ला पी. व्ही. सिंधूसाठी कमालीचा प्रेरणादायी ठरला. “बस मैदान पर उतरिए और खेलिए…” या विराटच्या शब्दांनी सिंधूचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला.

नवी दिल्लीतील बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळत असलेल्या सिंधूने आरसीबीच्या पॉडकास्टवर विराटसोबत झालेल्या संवादाची आठवण सांगितली. दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती सिंधू त्या वेळी एका कठीण टप्प्यातून जात होती. “काहीच होत नाहीये,” अशी भावना तिने विराटसमोर व्यक्त केली. त्यावर विराटने फार मोठे भाषण न देता थेट मैदानात उतरण्याचा सल्ला दिला.

“मला वाटतं, विराट माझ्या भावासारखे आहेत. मी खूप कठीण काळातून जात असताना त्यांना भेटले होते. मी त्यांना सांगितलं की काहीच होत नाहीये. तेव्हा त्यांनी फक्त एवढंच सांगितलं—‘बस मैदानावर उतरा, काही हरकत नाही. जा आणि खेळा,’” असं सिंधूने सांगितलं.

विराटचा हा साधा सल्ला सिंधूच्या मनावर खोलवर उमटला. निकालाची चिंता करण्यापेक्षा आपल्या खेळावर आणि तयारीवर विश्वास ठेवण्याचा मंत्र तिला मिळाला.

“त्यांनी मला सांगितलं की कुठेही, कोणत्याही परिस्थितीत मैदानावर उतरा आणि फक्त तुमचा खेळ खेळा. काय होणार? तुम्ही काहीही गमावणार नाही. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कोण आहात, तुम्ही कशी मेहनत घेतली आहे. त्यामुळे जगाला दाखवा की तुम्ही कोण आहात,” असं सिंधूने सांगितलं.

‘त्या संवादाने माझा दृष्टिकोनच बदलला’

विराटसोबतची ती भेट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरल्याचे सिंधूने स्पष्ट केले. निकालाच्या दबावापेक्षा मैदानावर उतरून आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची शिकवण तिला या संवादातून मिळाली.

विराटसोबत आजही संपर्कात असल्याचे सिंधूने सांगितले. “जेव्हा मी जिंकते, तेव्हा माझा आनंद त्यांच्यासोबत शेअर करते आणि मी हे किंवा ते जिंकल्याचं त्यांना सांगते. नुकतीच त्यांची भेटही झाली. एवढं यश मिळवलेल्या व्यक्तीला भेटणं आणि त्यांच्याकडून काही सल्ला किंवा मार्गदर्शन घेणं नेहमीच छान वाटतं,” असे ती म्हणाली.

दबावात विराटचा खेळ सिंधूला भावतो

मैदानावर उतरण्यापूर्वी विराटची मानसिक तयारी आणि दबावाच्या परिस्थितीत खेळण्याची त्यांची शैली आपल्याला नेहमीच प्रेरणा देते, असेही सिंधूने सांगितले.

“मैदानावर उतरण्यापूर्वी त्यांची विचार करण्याची पद्धत आणि ते ज्या प्रकारे खेळतात, ते पाहिलं की त्यांनी जे काही साध्य केलं आहे त्यासाठी त्यांना सलाम करावासा वाटतो,” असे सिंधू म्हणाली.

दरम्यान, बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सिंधूने दमदार सुरुवात केली आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात माजी विश्वविजेत्या सिंधूने आयर्लंडच्या सोफिया नोबलचा अवघ्या २९ मिनिटांत २१-७, २१-११ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या विजयासह सिंधूने राऊंड ऑफ ३२ मध्ये प्रवेश केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा