26 C
Mumbai
Saturday, January 3, 2026
घरक्राईमनामामुंबईकर म्हणतायत, 'थँक्यू देवेन भारती'

मुंबईकर म्हणतायत, ‘थँक्यू देवेन भारती’

समाजसेवा शाखेला आता कात्री

Google News Follow

Related

मुंबई पोलिसांची समाज सेवा शाखा (Social Service Branch) म्हणजे अत्यंत बदनाम शाखा. वसुली शाखा अशी जनमानसामध्ये समाजसेवा शाखेची ओळख. वरिष्ठ आयपीएस अधिकारी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पदाची सूत्र हाती घेतल्या घेतल्या हे वसुलीचे दुकान बंद केले आहे आणि त्यामुळेच मुंबईकर म्हणतायेत ‘थँक्यू देवेन भारती’.

समाजसेवा शाखा हे नाव ऐकून भलताच गैरसमज निर्माण होतो. या शाखेचा संबंध सेवेशी वगैरे अजिबातच नाही. मुंबईतील बार, बुकि, लॉटरी, कुंटणखाने यांच्या बेकायदा कारवयांवर हातोडा चालवण्याचे अधिकार या शाखेकडे असतात. अधिकाराचा वापर कमी आणि गैरवापर जास्त व्हायचा. मोठ्या प्रमाणात वसुली व्हायची, म्हणून देवेन भारती यांनी आल्या आल्या पहिल्याच क्राईम मीटिंगमध्ये समाजसेवे शाखेकडून बार, लॉटरी आणि बुकिंगवर कारवाई करण्याचे अधिकार काढून घेतले. देहविक्रयाच्या व्यवसायात अडकलेल्या दुर्दैवी मुलींना सोडवण्यापुरते हे अधिकार मर्यादित असतील, असे त्यांनी अत्यंत स्पष्टपणे अधिकाऱ्यांना बजावले.

ही ब्रँच बंद करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी मंत्रालयात प्रस्ताव पाठवलेला आहे, गृहमंत्री पदी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर व्हायला काहीच समस्या नाही.त्यामुळे बार वरील कारवायांमुळे एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात आलेली मुंबई पोलीस दलाची समाजसेवा शाखा बंद होण्याच्या मार्गावर आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हातात घेतल्या नंतर देवेन भारतीयांनी पोलीस खात्याची साफसफाई सुरू केली. बरीचशी दुकाने बंद केली. सर्वात प्रथम आर्थिक गुन्हे शाखेच्या अख्यत्यारीत येणारे सीबी कंट्रोल युनिट पुन्हा शाखा गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यानंतर देवेन भारती यांच्या रडारवर असलेल्या समाजसेवा शाखेचा नंबर आलेला आहे.

बियरबार,जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करणाऱ्या समाजसेवा शाखेकडून बार आणि जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याचे अधिकार काढून घेत स्थानिक पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेला बेकायदेशीर बियर बार आणि जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

हे ही वाचा:

सुधांशू त्रिवेदी म्हणतात, काँग्रेसचा विश्वास तरी कशावर आहे?

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच… : सीडीएस

कमल हासनसह चार सदस्यांनी राज्यसभेत घेतली शपथ

लोकसभेतील गतिरोध संपविण्यासाठी एकमत झाले

समाजसेवा शाखेकडून हे अधिकार काढण्यामागे पोलीस आयुक्त यांच्याकडून समाजसेवा शाखा बंद करण्याचे संकेत असल्याची चर्चा मुंबई पोलीस दलात सुरू आहे.दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेकडे असलेली सीबी कंट्रोल युनिट काढून पुन्हा गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे. एकेकाळी मुंबई पोलीस दलाचे हॉकीस्टिक मॅन म्हणून ओळखले जाणारे पोलीस अधिकारी वसंत ढोबळे यांनी बार,बेकायदेशीर धंदे यांच्यावर सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे समाज सेवा ही नावारूपाला आली होती. परंतु अशा कारवायांच्या मागे अनेकदा भलतेच कारण असल्याचे तक्रारी वरिष्ठांकडे वारंवार येऊ लागल्या.

समाजसेवा शाखेत बदली मिळावी म्हणून पोलीस अधिकाऱ्यामध्ये चुरस असायची. त्याचे कारणही उघड होते. परंतु ज्या कारणासाठी या शाखेकडे बऱ्याच अधिकाऱ्यांचा ओढा होता, कारणच पोलीस आयुक्तांनी संपुष्टात आणले. त्यामुळे यापुढे या शाखेकडे कोणी साधं ढुंकुनही पाहणार नाही अशी शक्यता आहे. समाज सेवाकडून कारवाईचे अधिकार काढुन घेतल्यामुळे या शाखेला उतरती कळा लागली असून ही शाखा बंद करतात की काय अशी कुजबुज पोलीस दलात सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा