बरेली हिंसाचार: मौलाना तौकीर रजांचे सचिव अफजल बेग कोर्टात शरणागत!

पोलिसांनी १५ हजार रुपयाचे बक्षीस केल होत जाहीर 

बरेली हिंसाचार: मौलाना तौकीर रजांचे सचिव अफजल बेग कोर्टात शरणागत!

“आय लव्ह मुहम्मद” वादावरून उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा पोलिसांचा तपास सुरू आहे. इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल (आयएमसी) प्रमुख मौलाना तौकीर रझा खान यांचे वैयक्तिक सहाय्यक आणि २६ सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसाचारातील वॉन्टेड आरोपी अफझल बेग यांनी गुरुवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात आत्मसमर्पण केले, असे पोलिसांनी सांगितले.

अफजल बेग गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर ₹१५,००० चे बक्षीस जाहीर केले होते. त्याने आपल्या वकिलासह कोर्टात आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर त्याला न्यायिक कोठडीत पाठवण्यात आले. अफजल बेग हा बरेलीतील विहारीपुर (सिव्हिल लाईन्स) येथील रहिवासी आहे. तो आयएमसी या संघटनेचा माजी पदाधिकारी देखील राहिला आहे. पोलिस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, शहरातील २६ सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात बेग हा वॉन्टेड होता.

अफजल बेगवर दोन प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत — एक हिंसाचारात सहभागी होणे, तर दुसरा बारादरी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल आहे. पोलीस आता अफजल बेगची रिमांड घेण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोधही पोलीस घेत आहेत आणि लवकरच आणखी अटक होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

पाक संरक्षण मंत्री म्हणतात, दोन आघाड्यांवर युद्धासाठी तयार!

कॅनडा, अमेरिकेतील विमानतळांवर सायबर हल्ला; हमास समर्थनार्थ संदेश प्रसारित

दिवाळी : भारतातील नव्हे जगभरातील नीतिमूल्यांचा, श्रद्धांचा उत्सव !

उलटे स्वस्तिक बनविणाऱ्या भक्तांच्या मनोकामना होतात पूर्ण

एसएसपी अनुराग आर्य यांनी सांगितले की, उर्वरित फरार आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी पोलिस लवकरच न्यायालयात अर्ज करणार आहेत. जर आरोपी स्वतःहून हजर झाले नाहीत, तर त्यांच्याविरुद्ध जाहीर करण्यात आलेल्या बक्षिसाची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे. तसेच, न्यायालयाच्या मान्यतेनंतर त्यांच्या मालमत्तेची जप्तीची कारवाईही सुरू केली जाऊ शकते.

Exit mobile version