१३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली २२ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आलेल्या तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) एका वरिष्ठ दलित नेत्याने आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील तुनीजवळ आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तुनी शहराच्या बाहेरील कोमाटी चेरुवूजवळ ही घटना घडली.
आरोपी तातिका नारायण राव याला पोलिसांनी ताब्यात घेवून दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यासाठी नेले जात असताना त्याने शौचालयात जाण्यासाठी गाडी थांबवण्यास सांगितले. पोलिसांची जीप थांबताच त्याने अचानक जवळच्या तलावात उडी मारली.
ग्रामीण मंडळ निरीक्षक चेन्नाकेशव राव म्हणाले की, त्यावेळी पाऊस पडत होता आणि त्यांच्यासोबत असलेले पोलीस कर्मचारी एका झाडाखाली आश्रय घेत होते. “त्याच क्षणी, आरोपीने अचानक तलावात उडी मारली. रात्रभर शोध घेऊनही मृतदेह सापडला नाही. सकाळी पुन्हा शोध सुरू झाला आणि नंतर मृतदेह सापडला,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा :
स्पाइसजेटच्या विमानाला तांत्रिक बिघाड
अमेरिकेचे ‘हे’ पाऊल म्हणजे युद्धाचे कृत्य! रशियाने असे का म्हटले?
अमेरिकेचे ‘हे’ पाऊल म्हणजे युद्धाचे कृत्य! रशियाने असे का म्हटले?
पोलिस हे आत्महत्येचे प्रकरण मानत आहेत. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी तलावातून बलात्कार आरोपी नारायण रावचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. दरम्यान, १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या तक्रारीवरून आरोपी नारायण रावला अटक करण्यात आले होते. या घटनेनंतर गुरुकुल शाळेबाहेर निदर्शने करण्यात आली. स्थानिकांनी कठोर कारवाईची मागणी केली होती.
