राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे मानवतेला धक्का बसला आहे. नवलगड परिसरातील कुमावास गावात एका व्यक्तीने बंदुकीने गोळ्या झाडून २५ हून अधिक निष्पाप कुत्र्यांना ठार मारले आहे. या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, डूमरा गावातील रहिवासी असलेला शेओचंद बावरिया याने हे कृत्य केले आहे. कुत्रा पाहताच त्याने बंदुकीतून गोळीबार सुरू केला. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, आरोपी त्याच्या एका साथीदारासह दुचाकीवरून फिरतो, कुत्र्यांना पाहताच त्यांचा पाठलाग करतो आणि नंतर त्यांना गोळ्या घालून निर्घृणपणे मारतो.
४ ऑगस्ट रोजी एका स्थानिक तरुणाने सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केल्यांनंतर ही घटना उघडकीस आली. व्हिडिओमध्ये गावात अनेक ठिकाणी कुत्र्यांचे रक्ताने माखलेले मृतदेह पडलेले दिसत आहेत आणि एक तरुण उघडपणे बंदुकीने गोळीबार करताना दिसत आहे.
हमिरी कलान गावच्या माजी सरपंच सरोज झांझाडिया यांनी या घटनेबाबत जिल्ह्याच्या एसपींची भेट घेतली आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. माजी सरपंच सरोज झांझाडिया यांनी म्हटले की, आरोपी बकऱ्यांच्या मृत्यूचे खोटे कारण सांगून कुत्र्यांना मारत आहे आणि नुकसानभरपाई मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सरपंचांनी असा दावा केला की कुत्र्यांनी कोणत्याही बकऱ्याला मारले नाही किंवा कोणालाही इजा केली नाही. हे सर्व एक सुनियोजित कट असल्याचे दिसते.
हे ही वाचा :
जस्टिस यशवंत वर्मा यांना दिलासा नाही
धराली : ५० नागरिक, १ जेसीओ आणि ८ जवान बेपत्ता
उमा भारतींनी साध्वी प्रज्ञा यांची भेट घेतली, म्हणाल्या- ‘मसिहा’
व्हायरल व्हिडिओच्या आधारे नवलगड पोलिस ठाण्यात प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल शुभकरण यांना तपासासाठी गावात पाठवण्यात आले होते, परंतु पोलिस पोहोचेपर्यंत कुत्र्यांचे मृतदेह सापडले नाहीत किंवा आरोपींचा कोणताही सुगावा लागला नाही. गावकऱ्यांनीही जबाब देण्याचे टाळले, ज्यामुळे तपासात अडथळा येत आहे.
राजस्थान के झुंझुनूं ज़िले की नवलगढ़ तहसील के कुमावास गांव में 'बावरी' नामक एक शिकारी ने 25 से अधिक मासूम कुत्तों को बंदूक से गोलियों से मार डाला। यह अमानवीय कृत्य न केवल कानून का उल्लंघन है, बल्कि नैतिकता और मानवता पर भी सवाल खड़े करता है।#Jhunjhunu #AnimalCruelty pic.twitter.com/UuPCQJFzRs
— Report1 Bharat (@Report1Bharat) August 7, 2025







