बांगलादेशी, रोहिंग्याविरुद्ध पोलिसांकडून शोधमोहीम राबवत धरपकड सुरु आहे. देशभरातून अशा अनेक घुसखोरांना पकडण्यात आले आहे, येत आहे. दुसरीकडे, पकडण्यात आलेल्या अशा घुसखोरांना त्यांना त्यांच्या देशात सोडण्याचे कामही सुरु आहे. याच दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कारवाई करत पाच घुसखोर बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करत त्यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
दक्षिण पश्चिम जिल्ह्याच्या ऑपरेशन्स सेलने दिल्लीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशींना अटक केली. उकिल अमीन, अब्दुल रहीम, मोहम्मद जाहिदुल इस्लाम, जिम्मू खातून आणि मोहम्मद झाकीर अशी अटक करण्यात आलेल्या घुसखोरांची नावे आहेत. या व्यक्तींना दिल्ली कॅन्टोन्मेंट परिसरात अटक करण्यात आली.
ताब्यात घेण्यात आल्यानंतर चौकशी केली असता त्यांनी २०२३ मध्ये भारतात प्रवेश केलेले बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित असल्याचे कबूल केले. FRRO (परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालय), दिल्लीच्या मदतीने हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, गुजरात पोलिस आणि इतर सुरक्षा संस्थांनी एक मोठी कारवाई करत २५० घुसखोर बांगलादेशी हद्दपार केले होते. ४ जुलै रोजी या बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने वडोदरा हवाई दलाच्या तळावरून बांगलादेशची राजधानी ढाका येथे पाठवण्यात आले.
हे ही वाचा :
अभिनेत्री अरुणा यांच्या घरी ईडीचा छापा
गुजरात पुल दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू
तहव्वुर राणाची कोठडी १३ ऑगस्टपर्यंत वाढवली
छांगुर बाबा प्रकरणात ईडीकडून तपास
त्यावेळी, कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व बांगलादेशी नागरिकांना हातकड्या लावण्यात आल्या होत्या. ही कारवाई गुजरातमधील बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरुद्धच्या मोठ्या मोहिमेचा एक भाग आहे, ज्या अंतर्गत गेल्या दोन महिन्यांत १२०० हून अधिक बेकायदेशीर बांगलादेशींना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे.
#WATCH | Delhi | The Operations Cell of the South West District has apprehended five Bangladeshis, namely Ukil Amin, Abdul Rahim, Mohd Zahidul Islam, Jimmu Khatoon, and Mohd Zakir, residing illegally in Delhi. The individuals were nabbed in the Delhi Cantonment area and admitted… pic.twitter.com/USgL1QBhLz
— ANI (@ANI) July 9, 2025







