ठाकरेंच्या दादरमधील आंदोलनाप्रकरणी तीन गुन्हे दाखल

शिवाजी पार्क पोलिसांची कारवाई

ठाकरेंच्या दादरमधील आंदोलनाप्रकरणी तीन गुन्हे दाखल

मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क परिसरात ठाकरे गटाने आयोजित केलेल्या आंदोलनाप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, अभिजीत दिपके आणि स्पर्धा परीक्षा घोटाळ्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आयोजित करण्यात आले होते.

शनिवारी (१९ जुलै) छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आयोजित सभेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या सभेत त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. तसेच स्पर्धा परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांवर कठोर कारवाईची मागणी केली.

मात्र, या कार्यक्रमादरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या काही अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार परवानगीतील अटींचे उल्लंघन, ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबतचे नियम मोडणे आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधण्याऐवजी सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. “देशाचे भविष्य वाचवण्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीशी सरकार संवाद का साधत नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

“जिथे तथ्य, तर्क असतात, तिथे गोंधळाला जागा नसते”

सॅलड खाल्लं आणि रुग्णालय गाठलं! अमेरिकेत लेट्यूसमुळे अतिसारचा उद्रेक

वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर अर्जेंटिनात हिंसाचार; चाहत्यांचा संताप अनावर

“मी ५६ वर्षांच्या तरुणाबद्दल बोलत नाही” मोदींचा राहुल गांधींना टोला

यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी सर्व राजकीय पक्षांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. तसेच दिल्लीतील ‘चला संसद’ आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातही आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली होती.

Exit mobile version