28.2 C
Mumbai
Thursday, July 23, 2026
घरक्राईमनामामुंबईतील आंदोलनाप्रकरणी ९०० हून अधिक आंदोलकांवर एफआयआर दाखल

मुंबईतील आंदोलनाप्रकरणी ९०० हून अधिक आंदोलकांवर एफआयआर दाखल

शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद

Google News Follow

Related

मुंबईतील सीजेपी आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याचा तसेच पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये 900 हून अधिक आंदोलकांना आरोपी करण्यात आले असून एफआयआर दाखल केले आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांबाबत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आंदोलकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर माहिम पोलीस ठाण्यात 100 हून अधिक, दादर पोलीस ठाण्यात 70 हून अधिक आणि सायन पोलीस ठाण्यात 40 हून अधिक आंदोलकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय वरळी पोलीस ठाण्यात 21 जणांविरोधात, काळाचौकी पोलीस ठाण्यात 20 हून अधिक, भोईवाडा पोलीस ठाण्यात 20 हून अधिक तसेच वडाळा टीटी पोलीस ठाण्यात 25 हून अधिक आंदोलकांविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान सोमवारी दादर चैत्यभूमी येथे झालेल्या आंदोलना प्रकरणी वरळी,सायन,काळाचौकी, वडाळा टिटी,भोईवाडा,दादर,माहीम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२),२२३,३७(१),३७(३) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अंतर्गत ३५० पेक्षा अधिक आंदोलकाविरुद्ध गुन्हे दाखल करून हे सर्व गुन्हे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

दादर येथील चैत्यभूमी परिसरात झालेल्या सीजेपी आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात 50 हून अधिक आंदोलकांना आरोपी करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या आंदोलनासाठी पोलिसांकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे परवानगीशिवाय आंदोलन केल्याचा तसेच सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग

शांततापूर्ण आंदोलनाला हिंसेची किनार

“पेपर लीक हा राजकारणाचा विषय नाही”

आता शेतकरी दिल्लीच्या दिशेने!

मुंबई पोलिसांनी सांगितले की, आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा तपास सुरू असून, संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, सीजेपी आंदोलनावरून दाखल झालेल्या या गुन्ह्यांमुळे मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वातावरणात चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनाचा अधिकार आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची पोलिसांची जबाबदारी या दोन्ही मुद्द्यांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
322,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा