छत्तीसगढच्या दुर्ग रेल्वे स्थानकावर मानवी तस्करी आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली दोन ननसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे, असे सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) अधिकाऱ्यांनी रविवारी (२८ जुलै) सांगितले. शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख सुकमन मांडवी आणि नन प्रीती मेरी आणि वंदना फ्रान्सिस अशी झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, स्थानिक बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये तिघांवर नारायणपूरमधील तीन मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर करून त्यांची तस्करी केल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, मुलींच्या जबाबानंतर आणि तीनही आरोपींच्या चौकशीनंतर, छत्तीसगड धार्मिक धर्मांतर कायदा आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीआरपी अधिकाऱ्याने सांगितले की, “मुलींनी सांगितले की, नन त्यांना नोकरीचे आमिष दाखवून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घेऊन जात होते. मुलींनी सांगितले की, सुकमन मांडवी त्यांना दुर्ग रेल्वे स्टेशनवर घेऊन आला होता जिथून त्यांना दोन्ही ननसोबत आग्र्याला जायचे होते.” दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
हे ही वाचा :
चीनमध्ये भूस्खलनात चार जणांचा मृत्यू, आठ जण बेपत्ता
शेअर बाजारात सेवी इन्फ्राची जोरदार एन्ट्री, आयपीओ गुंतवणूकदार नफ्यात
१६२ परदेश दौरे, २५ बनावट कंपन्या, ३०० कोटी रुपयांचा घोटाळा!
जर्मनीत ट्रेन रुळावरून घसरली, तिघांचा मृत्यू, अनेक जखमी!
केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून या प्रकरणात थेट हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधांनांना या प्रकरणात पारदर्शक आणि निष्पक्ष कार्यवाही सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.







