दिल्ली पोलिसांच्या दक्षिण पश्चिम जिल्ह्याच्या ऑपरेशन्स सेलने भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या तीन नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले आहे. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, नवी दिल्लीतील परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालय (एफआरआरओ) द्वारे त्यांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. इलोमुनो गॅब्रिएल (वय २९ वर्षे), चिनेदू पॉलिनस (वय ३३ वर्षे) आणि सुनुसी सानी (वय २६ वर्षे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला या तिघांनी दावा केला होता की त्यांच्याकडे नायजेरियन दूतावासात वैध व्हिसा जमा आहे. मात्र, नायजेरियाच्या उच्चायुक्तालय आणि इमिग्रेशन विभागाने केलेल्या पडताळणीत असे दिसून आले की ते भारतात जास्त काळ राहिले होते आणि कधीही त्यांच्या देशात परतले नाहीत. इलोमुनो गॅब्रिएल हा अमंब्रा येथील रहिवासी आहे. तर चिनेदू पॉलिनस हा असबा आणि सुनुसी सानी लागोस येथील रहिवासी आहे.
हे ही वाचा :
एच-१ बी व्हिसासाठी मोजावे लागणार १ लाख डॉलर्स! ट्रम्प यांनी का घेतला निर्णय?
ऑपरेशन सिंदूरनंतर पीओके वाटतोय असुरक्षित! पाकच्या ‘या’ भागात उभारतायत दहशतवादी तळ
उधमपूरमध्ये चकमक सुरू; जैशचे दहशतवादी असल्याची माहिती
राहुल गांधींनी माझा मोबाईल नंबर सार्वजनिक केला, मी तक्रार करेन!
पोलिसांना सागरपूर आणि पालम गाव परिसरात बेकायदेशीर आफ्रिकन स्थलांतरितांची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे कारवाई करताना, एका पथकाने संशयितांना अडवले आणि त्यांची ओळख पटवण्याची मागणी केली. त्यांनी वैध व्हिसा कागदपत्रे सादर केली नाहीत आणि त्यांनी देशात बेकायदेशीरपणे असल्याचे कबूल केले. त्यांच्या मोबाईल फोनची झडती घेतली असता, पोलिसांना त्यांच्या पासपोर्टच्या प्रती आणि नायजेरियन राष्ट्रीय ओळखपत्रांच्या प्रती सापडल्या. या पुरूषांनी पोलिसांना सांगितले की ते दिल्लीतील शाहपुरा, गुरुग्राम आणि नोएडा येथे त्यांच्या काही आफ्रिकन मित्रांसोबत घरकामाचे काम करत होते आणि पालम गावाजवळील द्वारका सेक्टर- १ मध्ये राहत होते. त्यांना ताब्यात घेण्यात आले तेव्हा ते कामाच्या शोधात होते.
