जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी तळ या कारवाईत उध्वस्त करण्यात आले. यानंतर आता दहशतवादी गटांनी आपली केंद्रे या भागांमधून हलवण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. भारताने हल्ले केल्यानंतर सुरक्षित आश्रय घेण्यासाठी म्हणून दहशतवादी गटांनी खैबर पख्तुनख्वामध्ये जाण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी दहशतवादी गटांनी, विशेषतः जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतात स्थलांतर सुरू केल्याची माहिती आहे.
दहशतवादी गट आता खैबर पख्तूनख्वाला त्यांच्या दहशतवादी तळांसाठी पीओकेपेक्षा सुरक्षित ठिकाण मानतात. या दहशतवादी संघटनांचा असा विश्वास बसला आहे की, भारताच्या हल्ल्याच्या धोक्यामुळे पीओके आता दहशतवादी तळांसाठी असुरक्षित आहे. तर, खैबर पख्तूनख्वा प्रांत हा भौगोलिकदृष्ट्या आणि अफगाण सीमेच्या जवळील स्थानामुळे अधिक सुरक्षित आहे.
खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटना किती प्रमाणात फोफावत आहेत हे दाखवण्यासाठी, जैश-ए-मोहम्मदने १४ सप्टेंबर २०२५ रोजी मानसेहरा जिल्ह्यातील गढी हबीबुल्लाह शहरात भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना सुरू होण्याच्या सुमारे सात तास आधी सार्वजनिक भरती मोहीम राबवली. हा कार्यक्रम देवबंदी धार्मिक मेळाव्याचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. एम४ रायफल्सने सज्ज असलेल्या आणि गढी हबीबुल्लाह पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर लियाकत शाह यांच्यासह स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली आयोजित करण्यात आलेली ही सार्वजनिक रॅली जैश आणि जेयूआय यांच्या संयुक्त नेतृत्वाखालील एक समन्वित जमावबंदीचा प्रयत्न होता. भारतात हवा असलेला आणि केपीके आणि काश्मीरसाठी जैशचा अमीर मौलाना मुफ्ती मसूद इलियास काश्मिरी उर्फ अबू मोहम्मद याने एका मेळाव्याला संबोधित केले.
हे ही वाचा :
उधमपूरमध्ये चकमक सुरू; जैशचे दहशतवादी असल्याची माहिती
राहुल गांधींनी माझा मोबाईल नंबर सार्वजनिक केला, मी तक्रार करेन!
‘नेपाळ मॉडेल भारतात लागू करायचंय का? तिथे तर राजघराणं पाडलं’
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत अभाविपचा अध्यक्ष, डाव्या संघटनांचा सुपडा साफ
मौलाना मसूद अझहर याचा जवळचा सहकारी अमीर मौलाना मुफ्ती हा ऑपरेशन सिंदूरपासून जैश-ए-मोहम्मदच्या ऑपरेशनल पुनर्रचनेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शिवाय मसूद इलियास काश्मिरी यांचे भाषण वैचारिक आणि भरती-केंद्रित होते, असे बोलले जाते. त्याने ओसामा बिन लादेनचे कौतुक करण्यात ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवला,त्याने जैश-ए-मोहम्मदच्या वैचारिक विचारसरणीचा थेट संबंध अल-कायदाच्या वारशाशी जोडला. खैबर पख्तूनख्वा दहशतवाद्यांसाठी किती सुरक्षित आहे. हे स्पष्ट करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा कंधार विमान अपहरणाचा उल्लेख केला. त्याने स्पष्ट केले की अपहरणानंतर, जेव्हा मसूद अझहर भारतातील तिहार तुरुंगातून सुटून पाकिस्तानला परतला तेव्हा खैबर पख्तूनख्वा येथील बालाकोट त्याचे मुख्यालय बनले. त्याने या ठिकाणाचे वर्णन मुजाहिदीनसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून केले. त्यानंतर त्याने ७ मे रोजी जैश-ए-मोहम्मदच्या मरकझ सुभानल्लाहवर झालेल्या भारतीय हल्ल्यानंतरच्या घटना सांगितल्या. हा तोच हल्ला होता ज्यामध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला होता. इलियास काश्मिरीने स्वतः दावा केला होता की भारतीय हल्ल्यामुळे मृतदेह पूर्णपणे विद्रूप झाले होते. तर, असीम मुनीर यांनी वैयक्तिकरित्या लष्करी कमांडरना दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.







