28.4 C
Mumbai
Thursday, August 13, 2026
घरसंपादकीयइस वक्त वो कौन कुत्ते है... 

इस वक्त वो कौन कुत्ते है… 

Google News Follow

Related

पियूष मिश्रा हा जबरदस्त गीतकार आहे. कम्युनिस्टोने तो मेरी जिंदगी खराब कर दी… हे त्याचे विधान प्रचंड गाजले आहे. सध्या झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत त्यांचा एक प्रश्न गाजतो आहे.

हा प्रश्न त्याने जेष्ठ अभिनेते, मुघलांचे प्रशंसक, घनघोर मोदी विरोधक नसीरुद्दीन शहा यांना केला असला तरी तो विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कॉकरोच अभिजीत दिपके, महाराष्ट्रातील एका पडीक अभिनेत्री आणि पार्टटाईम कवयित्री यांच्यासह अनेकांना लागू आहे. नसीरुद्दीन यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी गप्प बसलेल्या बॉलिवूडच्या कलाकारांना फटकारताना विधान केले होते, जिन कुत्तो के मुंह मे हड्डी है, उनकी आवाज बंद है… ते स्वत: मात्र झारखंड विद्यार्थी आंदोलनप्रकरणी तंबाखूची मळी भरल्यासारखे गप्प होते. त्यांना पियूष मिश्राने विचारले प्रतिप्रश्न केला, इस वक्त वो कौन कुत्ते है जिन के मुह मे हड्डी है ?

झारखंडच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी पियूष मिश्रा स्वत: तिथे गेले, त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यांना पाठिंबा दिला. तिथे त्यांनी जो प्रश्न सध्या उर्दूमध्ये शिव्या घालण्याचा शौक जडलेल्या नसीरुद्दीन शहा यांना केला, तो केवळ शहा यांच्या पुरता मर्यादीत नाही. अनेकांना हा प्रश्न झोंबणार आहे. मिश्रा यांच्या या प्रश्नाने अनेकांची बिन पाण्याने हजामत करून टाकली आहे.

संसदेवर मोर्चा नेणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे निमित्त करून विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी संपूर्ण पावसाळी अधिवेशनात धिंगाणा घातला. झारखंडमध्ये जिथे राहुल गांधी यांचा पक्ष सरकारमध्ये सामील आहे, तिथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराबाबत मात्र ते गप्प राहीले. कॉकरोच अभिजीत दिपकेही मूग गिळून बसला. नीट पेपरफुटीशी संबंधित ज्या मागण्या मोदी सरकारने मान्य केल्या, त्याच मागण्यांना झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. गृहमंत्री अमित शहा संसदेत या विषयावर निवेदन करणार, असे जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी तिथेही पळपुटेपणा दाखवला. विद्यार्थी प्रेमाचे फक्त नाटक होते, खरा धंदा मोदी विरोधाचाच होता. राहुल गांधी आणि अभिजीत दिपके हे दोघेही दोघेही उघडे पडले आहेत.

हे ही वाचा:

ब्रिटिश स्पाय ड्रोनमधून चीनला सिग्नल? सुरक्षा तपासणीत धक्कादायक कनेक्शन उघड

चित्रपट चालो न चालो, पॉपकॉर्नची कमाई मात्र जोरात

मिल्की मिस्टचा ₹१,५५३ कोटींचा आयपीओ खुला

भारतीयांच्या गृहकर्जाच्या मागणीत मोठी वाढ

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन करावे, अशी मागणी राहुल गांधी करत होते. तेच निमित्त करत संसदेत गदारोळ घालून काम बंद पाडले जात होते. संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीनंतर किरेन रिजीजू यांनी काल जाहीर केले की, गृहमंत्री संसदेत निवेदन करायला तयार आहे, परंतु ते बोलतील तेव्हा पळ काढू नका. त्यांचे भाकीत खरे ठरले, राहुल गांधी यांनी खरोखरच पळ काढला. गोलपोस्ट बदलत आम्हाला गृहमंत्र्यांच्या निवेदनात रस नाही, अशी भूमिका त्यांना काल पत्रकार परीषदेत मांडली.

आमचे सरकार आहे, त्या राज्यात वाट्टेल ते झाले तरी आम्ही बघणार नाही, बोलणार नाही, तुम्हालाही बोलू देणार नाही, फक्त भाजपा शासित राज्यांमध्ये काही झाले तर आम्ही संसदेला वेठीस धरणार अशी राहुल गांधी यांची भूमिका आहे. सरकारने या मानसिकतेवर बुलडोझर फिरवला पाहीजे. कॉकरोच अभिजीत दिपके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ठणाणा करतो. परंतु झारखंडमध्ये सत्तेत सामील असलेल्या राहुल गांधीना जाब विचारत नाही. उलट त्यांना दिल्लीत भेटायला जातो, त्यांच्याशी चर्चा करतो. कारण स्पष्ट आहे, हे दोघेही सुपारीबाज आहेत, एकाने सोरोसची सुपारी घेतली आहे, दुसऱ्याने सोरोस पोषित केजरीवालची.

झारखंड सरकार जेपीएससी परिक्षे घोटाळ्याची सीबीआय चौकशी करायला तयार नाही. याचा अर्थ दाल मे कुछ काला है. ही चौकशी सरकारला महागात पडू शकते. कारण या घोटाळ्यात सरकारचा सहभाग आहे. जेपीएससीचे माजी अध्यक्ष एल. खियांगटे याला सीआयडीने अटक केली आहे. हा जुलै २०२६ पर्यंत कार्यरत होता. घोटाळा उघड झाल्यानंतर त्याने राजीनामा दिलेला आहे. काळ्या यादीत टाकलेल्या टीडीपीएल या कंपनीला यानेच परीक्षेचे कंत्राट आऊटसोर्स केले. हे कंत्राट मिळवण्यासाठी खियांगटे याला दोन कोटीची लाच देण्यात आली होती, असा खुलासा या कंपनीनेच केला आहे. खियांगटे हा आयएएस अधिकारी असून झारखंडचा मुख्य सचिव म्हणून २०२३ मध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली. २०२४ मध्ये निवृत्त झाल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या आशीर्वादाने त्याची नियुक्ती झारखंड लोक सेवा आयोगावर (जेपीएससी) करण्यात आली.

परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन सरकारी नोकरीची पदे विकण्यात आली होती. हे संपूर्ण प्रकरण पाहीले तर सत्तेवर बसलेल्या धेंडांचा यात समावेश असल्याशिवाय इतका मोठा घोटाळा शक्य नाही. कदाचित याचे धागेदोरे थेट सोरेन यांच्यापर्यंत जाऊ शकतात. याचा मलिदा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसनेही ओरपला असणार, तो दिल्लीपर्यंत पोहोचवण्यात आला असणार. त्यामुळे इथे सोरेन सरकारला सीबीआय चौकशी नको आहे. इथे सीबीआय चौकशी झाली तर सरकार गडगडू शकते. विद्यार्थ्यांच्या मागणी प्रमाणे फेरपरीक्षा घ्यायची तर ज्या परिक्षार्थ्यानी नोकरी मिळवण्यासाठी सरकारमध्ये सामील असलेल्या लोकांना लाखो रुपये लाच दिली ते ओरडा करणार, म्हणूनच राहुल गांधी या सगळ्या बाबींकडे डोळेझाक करतायत आणि केंद्र सरकारकडे जाब मागतायत. झारखंडमध्ये झालेला लाठीमार चुकीचा आहे, अशी साळसूद प्रतिक्रिया व्यक्त करून राहुल गांधी गप्प बसले. बस्स, यापुढे काही नाही. तिथे ना कुणाचा राजीनामा मागितला. ना सीबीआय चौकशीची मागणी केली. फेरपरीक्षाही त्यांना नको आहे. राहुल यांच्या विद्यार्थी प्रेमाचे वस्त्रहरण झारखंडच्या विद्यार्थ्यांनीच केले आहे.

संसदेतही राहुल गांधी यांची ढोंगबाजी उघड झाली आहे. गृहमंत्री निवेदन करणार, असे म्हटल्यावर राहुल गांधी यांची कढी पातळ झाली. कारण त्यांना माहिती आहे, झारखंडमध्ये झालेल्या लाठीमाराचे प्रकरण, तिथे झालेल्या परीक्षा घोटाळ्याचे प्रकरण संसदेत उपस्थित केले जाणार, हे ठाऊक असल्यामुळे राहुल गांधी यांना आता निवेदनात रस उरलेला नाही. अमित शहा बोलतात तेव्हा राहुल नेहमीच पळ काढतात. जर संसदेत थांबले तर शहा त्यांना चांगलेच सोलून काढतात, हा अनुभव राहुल यांना आहे. त्यामुळे ते या भानगडीत पडले नाहीत. शब्दांचे फटकारे खाण्यापेक्षा पळालेले बरे असा निर्णय त्यांनी घेतला.

राहुल गांधी यांच्या मूड स्विंग प्रमाणे संसदेचे कामकाज चालणार आहे का? अभिजीत दिपके नीट पेपरफुटीबाबत किती पोटतिडकीने बोलत होता. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्याने डायलॉगबाजी केली, दुनिया झुकती है झुकानेवाला चाहीये. मोदींना झुकवल्याचा त्याचा गैरसमज होता. झारखंडमध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून हा तिथे फिरकला नाही. याचे एकूणच कारनामे आता बाहेर येतायत. बोस्टन युनिवर्सिटीत हा स्कॉलरशिप घेऊन शिकल्याचा दावा करतो. तिथे नेमके काय शिकला, कोणती स्कॉलरशिप त्याला मिळाली होती, याबाबत प्रश्न केला तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट दाखवतो. बोस्टन युनिवर्सिटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीत अभिजीत दिपके नावाचे कुणी नाही. हा अमेरिकेत वेगळेच काही दिवे लावायला गेला होता, ही बाब हळुहळु स्पष्ट होते आहे. ग्रेटर कैलाशमधील सौरव दास याच्या भाड्याच्या आलिशान घराबाबतही गौडबंगाल आहे. त्या घराचा भाडे करार गहाळ झाल्याची तक्रार घर मालकीणीने केली आहे.

हे सगळे संशयास्पद आहे. दिपके टोळीतील प्रत्येकाला काही तरी लपवायचे आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली मोदींची सुपारी वाजवायची आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा