28.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरक्राईमनामातिहेरी तलाक, हलालाची धमकी... यूसीसीअंतर्गत गुन्हा दाखल

तिहेरी तलाक, हलालाची धमकी… यूसीसीअंतर्गत गुन्हा दाखल

उत्तराखंडमध्ये महिलेने केली तक्रार

Google News Follow

Related

उत्तराखंडमधील हरिद्वार येथे एका महिलेने तिच्या पतीसह सासरच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पतीने तिला तिहेरी तलाक दिला, तसेच हलाला करण्याची धमकी दिल्याचा महिलेचा आरोप आहे. याशिवाय तिच्यावर मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी हरिद्वारच्या बादशाहपूर परिसरात मुस्लिम महिला (विवाहावरील अधिकारांचे संरक्षण) कायद्यासह उत्तराखंडच्या समान नागरी संहितेतील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नवनीत सिंह भुल्लर यांनी सांगितले की, महिलेने तिच्या पतीसह सासरच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर तिहेरी तलाक दिल्याचा आणि हलाला करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. भुल्लर म्हणाले, “महिलेने तिच्यावर मारहाण, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही आरोप केले आहेत.”

हे ही वाचा:

१ ऑक्टोबरपासून एफडीचे नियम बदलणार

पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये केला राजिंदर सिंह यांचा गौरव

‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदे खंडणी, मारहाण प्रकरणी गेली गजाआड

आशियाई गेम्समधील भारताचे बॅडमिंटन आव्हान संपले

पोलिसांनी तिहेरी तलाकविरोधी कायद्यातील तरतुदींसोबतच हलालासंदर्भातील समान नागरी संहितेतील तरतुदी लागू केल्या आहेत. याशिवाय शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी यासंदर्भातील कलमांचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.

या प्रकरणात महिलेचा पती हा मुख्य आरोपी असल्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी एका महिला उपनिरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस महिलेने केलेल्या सर्व आरोपांची चौकशी करत आहेत. तपासादरम्यान समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नवनीत सिंह भुल्लर यांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेने तिच्यासोबत वैवाहिक घरात राहणाऱ्या पतीच्या कुटुंबातील अनेक सदस्यांविरोधातही आरोप केले आहेत. या सर्व आरोपांची चौकशी सुरू असून, तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा