31.4 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरस्पोर्ट्सआशियाई गेम्समधील भारताचे बॅडमिंटन आव्हान संपले

आशियाई गेम्समधील भारताचे बॅडमिंटन आव्हान संपले

पी. व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव

Google News Follow

Related

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला चीनच्या चेन यू फेईकडून २१-११, १८-२१, १०-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील भारताचे बॅडमिंटनमधील आव्हान संपुष्टात आले.

सिंधूने सामन्याची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. तिने पहिला गेम २१-११ असा जिंकत चेन यू फेईवर दबाव निर्माण केला. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली. मध्यंतराला सिंधूकडे ११-१० अशी आघाडी होती. सामना १६-१६ असा बरोबरीत आल्यानंतर सिंधूने शानदार स्मॅश लगावत १७-१६ अशी आघाडी मिळवली. मात्र त्यानंतर चेन यू फेईने सलग गुण मिळवत दुसरा गेम २१-१८ असा जिंकला.

निर्णायक तिसऱ्या गेममध्ये सिंधूला पहिल्या दोन गेममधील लय कायम राखता आली नाही. मध्यंतराला चेन यू फेईने ११-७ अशी आघाडी घेतली. त्यानंतरही चिनी खेळाडूने आपले वर्चस्व कायम ठेवत तिसरा गेम २१-१० असा जिंकला आणि सामना २-१ असा खिशात घातला.

विशेष म्हणजे, २४ तासांपेक्षा कमी कालावधीत सिंधूचा हा तिसरा सामना होता.

🇮🇳 भारतीय बॅडमिंटनला एकच पदक

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या बॅडमिंटन मोहिमेत पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत केवळ कांस्यपदक मिळाले. एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीतील कोणत्याही भारतीय खेळाडूला पदक मिळवता आले नाही.

यापूर्वी उन्नती हुड्डा हिला तीन वेळा विश्वविजेती ठरलेल्या अकाने यामागुचीकडून १६-२१, २१-१४, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला.

महिला दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना मलेशियाच्या थिनाह मुरलीधरन आणि पर्ली टॅन या जोडीने २१-१८, २१-८ असे पराभूत केले.

तर मिश्र दुहेरीत तनिशा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांना जगातील क्रमांक एकच्या चिनी जोडीविरुद्ध १४-२१, २१-१८, १८-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा