29 C
Mumbai
Sunday, September 27, 2026
घरक्राईमनामा'बिग बॉस' फेम दिव्या शिंदे खंडणी, मारहाण प्रकरणी गेली गजाआड

‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदे खंडणी, मारहाण प्रकरणी गेली गजाआड

माजी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसखोरी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमाला बोलावलेले नसताना तिथे जाऊन त्या कार्यक्रमाची आपल्यामुळेच प्रसिद्धी झाल्याचा दावा करून पाच लाख मागणारी बिग बॉस फेम दिव्या शिंदे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात तक्रार करणारे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांना मारहाणही करण्यात आली होती.

दिव्या शिंदेने आपल्या लोकांसह गायकवाड यांच्या घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. पैशांची मागणी करत तिने गायकवाड यांना धमकी दिल्याचा गंभीर आरोपही आहे. गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, दिव्या शिंदे आपल्या काही साथीदारांसह त्यांच्या घरी धडकली. त्यावेळी घरात आपण एकटे असताना आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.या मारहाणीत दिव्याच्या साथीदारांनी डोकं, मान आणि छातीसह शरीराच्या इतर भागांवर गंभीर दुखापत केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. गायकवाड यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने प्रहार करण्यात आला तसेच त्यांना दांडक्याने, कमरेच्या पट्ट्याने आणि भांड्याने मारहाण करण्यात आली. पैसे दिले नाहीस तर जीवे मारू अशी धमकीही देण्यात आली.  घरातील वस्तूंची तोडफोड करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

दिव्या शिंदे ही स्वतःला सरकार म्हणवते आणि बिग बॉसमध्येही तिने इतर सहभागी स्पर्धकांना मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिची बिग बॉसमधून हकालपट्टी करण्यात आली होती.

हे ही वाचा:

पाच लाख रुपयांची खंडणी

या प्रकरणात पाच लाख रुपयांची मागणी करून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारदाराने केला आहे.

दिव्या शिंदेला कोठडी

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दिव्या शिंदेला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दिव्या शिंदेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, ३० सप्टेंबरपर्यंत त्या पोलीस कोठडीत राहणार आहेत.

या कालावधीत पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास केला जाणार आहे. कथित मारहाणीमागील नेमकं कारण, पैशांची मागणी, घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या इतर व्यक्तींची भूमिका तसेच घरातील तोडफोडीबाबत पोलिसांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा