27 C
Mumbai
Wednesday, February 11, 2026
घरक्राईमनामा१७ कोटी रुपयांचे ड्रग्स पोटात ठेवून तस्करी करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अटक!

१७ कोटी रुपयांचे ड्रग्स पोटात ठेवून तस्करी करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अटक!

दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाची कारवाई

Google News Follow

Related

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी कोकेनची मोठी खेप जप्त केली आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे १७.६८ कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या प्रकरणी कस्टमने फिलीपाईन्सच्या दोन नागरिकांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दोन्ही घटनांमध्ये आरोपींनी कोकेनची मात्रा कॅप्सूलमध्ये भरून गिळली होती. विमानतळावर चौकशी दरम्यान दोघांच्या पोटात कॅप्सूल असल्याची माहिती मिळाली.  यानंतर प्रथम विमानतळावर आणि नंतर सफदरजंग हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली आरोपींच्या पोटातून कॅप्सूल काढण्यात आल्या. एका आरोपीच्या पोटातून ६६ कॅप्सूल तर दुसऱ्याच्या पोटातून ९० कॅप्सूल अशा एकूण १५६ कॅप्सूल काढण्यात आल्या. या कोकेनची किंमत १७ कोटीहून अधिक आहे.

या प्रकरणी दोन्ही परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाकडून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, आत्तापर्यंत तस्कर हे आफ्रिकन नागरिकांचा वापर करून अमली पदार्थांची खेप एका देशातून दुसऱ्या देशात नेत असत, मात्र आता फिलीपाईन्सचे नागरिकही या काळ्या धंद्यात उतरू लागले आहेत.

हे ही वाचा : 

राम मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू!

मनालीत अडकलेल्या १० हजार पर्यटकांची सुटका

अण्णा विद्यापीठ लैंगिक अत्याचार प्रकरण : मद्रास उच्च न्यायालयाने स्वतःहून केली कारवाई

भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांचं नाव जवळपास निश्चित!

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा